आणि अक्षयने तेवढी मदत केलीच असती नाही?
४४८ करोडात मंगळावर गेलेल्या यानाच्या एका चित्रपटाने आज बॉक्स ऑफिसवर ९२ करोडाच्या घरात धंदा केला. मंगळ यानावेळी चित्रपट आला असता तर सरकारला तेवढाच हातभार लागला असता.
तर्र...
मिशन मंगल यासाठी पहावा...
आजपर्यंत जे विज्ञानात शिकवले ते बाऊन्स गेलंच होते. परंतु यापुढे चंद्रयानसारखे प्रयोग जेव्हा देशात घडतील, तेव्हा बातम्या ऐकून त्यामागचं रसायन, त्याची मूलभूत रचना तुम्हाला माहिती असेल. अंदाज येईल की, एका सॅटेलाईटमध्ये कितीतरी रॅकेट बसविले जातात, पण त्याकरिता डिझायनिंग, प्लॅनिंग, व्यवस्थापन, बॅटरी, ऑटोमॅटिक सुईंग कपडा/ इतर घटक, छोट्या जागेत सगळे तंत्रज्ञान बसविणे, कॅमेराचा वापर, इंधन आणि मुख्यत्वे वातावरण या सगळ्याचे काय महत्व असते. चित्रपटापूर्वी याची मला खरंच कल्पना नव्हती. हे जरी गुगल बाबाकडे उपलब्ध असले तरी ते वाचण्यापेक्षा मनोरंजनाचा टच असलेल्या सिनेमाकडून ते कळत असेल तर ते जाणून घेण्यात साहजिक उत्सुकता वाटते. शिवाय प्रत्येक दृष्यानंतर वेगवेगळे भाव अनुभवायला मिळतात. आणि शेवटच्या दृष्य्यात संपूर्ण थिएटरात सन्नाटा, जॉ ओपनिंग मुमेंट आणि गर्व अनुभवायला मिळतो. ते वेगळंच!

का पाहू नये?
देशभक्ती जागृत झाली म्हणून जाऊ नका. शेवटी चौकीदारच्या आवाजातल्या चार ओळी ऐकायला लागतात आणि दुर्दैवाने मिशन मंगलचे क्रेडिट त्यांनी घेतले होते, तो क्षण आठवतो. बाकी, अक्षय कुमारच्या मोदिमय असण्याला बाजूला ठेऊन हा चित्रपट पाहताना अक्षय खरंच हँडसम वाटतो...

चित्रपटाबद्दल :
सेमी बायोग्राफिकल सायफाय फिल्म असलेला मिशन मंगल सिनेमा विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, निथ्या मेनेन, कृति कुल्हारी, शर्मन जोशी, हरिहर दत्तात्रेय आणि अक्षय कुमार या सगळ्यांचा.

पण हे मिशन मिसाल झाले ते राकेश धवन, तारा शिंदे, एका गांधी, कृतिका अग्रवाल, वर्षां गावडा, नेहा सिद्दीकी, परमेश्वर नायडू, अनंत आयर आदी वैज्ञानिकांमुळे.
पात्र:
वर्षा पिल्लाई (निथ्या मेनेन) : जी टीममधील इतर शास्त्रज्ञांपैकी जाडी असते, त्यावर फॉर्म बघताना विद्या अक्षयला म्हणते कुछ जादा मोटी नहीं? आणि त्यालाच जोडून ती हळूच म्हणते, "ये बोलने का मुझे हक नहीं | "
हे संभाषण तेव्हा प्रभावी वाटते जेव्हा आपल्याला आठवते की, काही दिवसांपूर्वी विद्यालाही बॉडी शेमिंगमुळे ट्रेण्ड केले जाते. त्यामुळे या वाक्यात इमोशन जाणवून त्यावर तिने सफाईदारपणे तिची बाजू मांडल्यासारखे भासते.
याशिवाय, पिल्लाई यांची सासू नातू व्हावा म्हणून खडूस झालेली असते... ही एक युनिक शास्त्रज्ञ असते जी गर्भवती होऊन मंगळ प्रोजेक्टसाठी काम करण्यास सुरुवात करते.

दुसरी असते कृत्तिका अगरवाल (तापसी पन्नू) : लेफ्टनंट असलेल्या नवर्याला फिल्डवर दुखापत झाल्यामुळे चिंतेत येऊन ती या प्रोजेक्ट मधून माघार घेते. पण नवरा देशभक्त म्हणून तिचं या मिशनचा भाग होणे सहज शक्य होते.
नेहा सिद्दीकी (कृति कुल्हारी): जी मुस्लिम दाखवली असून तिच्या नवर्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्यामुळे ती हॉस्टेलवर राहू लागते. परंतु एकटीसाठी घर शोधताना तिच्या जातीमुळे तिला कोणीच घर द्यायला तयार नसते.
एका गांधी (सोनाक्षी सिन्हा): जी अनाथ असते पण इस्त्रोकडून तीन वर्षाचा अनुभव घेऊन तिला अमेरिकन नासा मध्ये जाण्याची इच्छा असते.
परमेश्वर (शर्मन जोशी) : हा आजही ३ इडिएट्समधीलच राजू आहे. त्याच्याशिवाय हा रोल कुणाचाच नव्हता.
अनंत अय्यर (हरिहर दत्तात्रेय): हा व्यक्ती वयाच्या मानाने अधिकच भाव खाऊन गेला. कमी वेळ आहे पण जास्त आहे तेही.
आणि शेवटी उरते ती तारा शिंदे (विद्या) प्रोजेक्ट डायरेक्टर आणि ती उरतेच! मनात आणि शरीराच्या नसानसांत तिचं चैतन्य स्फुरते आणि वाटते, गृहिणी म्हणजे कमीपणा नाही. बॅक ऑफ द माईंड स्वप्न सतत चालू असावं. त्यामुळे इस्रोची स्त्री असो वा कुठलीही तिचं घर तिचीच जबाबदारी असते.
या पाच स्त्रिया, तीन पुरुष आणि १७ हजार शास्त्रज्ञांच्या मिशनला मॉम हे नाव दिलं जाते...
फिल्म अप्रिसिएशन :
कॉमेडी, वास्तविकता, संगीत, कथा लेखन, स्क्रिन प्ले, पात्र, एकसंगती आणि या सगळ्यांची जुळून आलेली ही साखळी खऱ्या अर्थाने पॅकेज आहे.
पण चित्रपटाची नेमकी सुरुवात कुठून करायची हे किती मोठं आव्हान असेल, नाही?. कारण विषय तितका शास्त्रीय आहे. लोकांना समजावा असा विचार करून संहिता लेखन ( स्क्रिप्ट रायटींग) करणं म्हणजे लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं आहे. पण मंगळवर जाणाऱ्या टीमची खासियत होती की, "होम सायन्सने मंगळावर जाणे शक्य आहे. होम सायन्सने रॉकेट सायन्स शक्य... !" या समिकारणाला समोर ठेवत प्रत्येक चलचित्र जोडले गेले आहे.
त्यामुळे सुरुवात होते विद्याच्या वैयक्तिक आणि संसारी आयुष्यापासून ... या पहिल्या सिनमध्ये तिचा नवरा पूर्वग्रहदूषित दाखवला असून तो घरातील सगळ्या गोष्टीवर नियंत्रित ठेवण्याचा दिखावा कम प्रयत्न करतो. एक मुलगा आहे, ज्याला ए आर रेहमानसारखा सुफी संगीतकार व्हायचे म्हणून तो मुस्लिम धर्माला फॉलो करू लागतो. कारण त्याला वाटते मुस्लिम धर्मांतर केले तर आपण सहज ए आर रेहमान बनू शकतो, एक सासरे आहे ज्यांना सुनेच्या कामाची कदर आहे आणि एक मुलगी आहे जी पाश्चात्य संस्कृती फॉलो करणारी आहे. या सगळ्यांची मॉम आहे तारा शिंदे. पण, या शास्त्रज्ञाची खासियत आहे, तिची कशाबद्दल तक्रार नाही. कारण तिचे स्वप्न तिचा फोकस आहे. पण म्हणून चूल आणि मूल या ओझ्याखाली न राहताही घरातील सगळी कामे आवरून इस्रोला जाते.
विचार येतोच मनात, हे शक्य आहे का ?

आणि सुरुवात होते चित्रपटाला...
चांद्रयान सॅटेलाईट अवकाशात सोडणाऱ्या दृष्यापासून. पण हे मिशन अयशस्वी ठरते, याचे नेतृत्व राकेश धवन (अक्षय कुमार) करत असतात. मिशन अयशस्वी होण्यामध्ये काही अंशी विद्या बालनने केलेली चूक कारणीभूत ठरते. कारण सॅटेलाईट अयशस्वी होण्याच्या कारणांपैकी 'हवामान' हे एक कारण असते, ते त्यावेळी समजत जाते. त्याशिवाय एक अयशस्वी सॅटेलाईट किती नुकसान करते, तसेच मिशनवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी अशी परिस्थिती म्हणजे 'जगा किंवा मरा' अशी असते... हे पहिल्या सिनमध्ये जाणवू लागते.
हळूहळू मन विद्या बालन होऊन चित्रपट पाहू लागतं.
पहिल्या अयशस्वी सॅटेलाईट लॉन्चिंगनंतर इस्रोब्रांच भारतातून नासामध्ये गेलेल्या व्यक्तीला दलीप ताहीलला पुढील मिशनसाठी बोलावते. तेव्हा आपलीच लोकं ज्याप्रमाणे नासासमोर इस्रोची तुलना करतात, ते मनाला दुःख देणारे ठरते.
परंतु अयशस्वी मिशनमुळे धवन यांना कुचकामी मिशन मंगळवर पाठविण्यात येते. या अपयशामुळे इस्रोचे प्रमुख जेव्हा अविश्वास दाखवता तेव्हा धवन म्हणतो, संशोधक आहे, म्हणून काहीतरी शोधायचं म्हणत "आजपर्यंत कुठलाच छंद नाही ना नाती जपली मी. आता अचानक अस झाल्यानंतर लग्न करू का? " ही उपरोधिक ओळ विचार करायला भाग पाडते.
अपयशामुळे राकेश धवन निराश झालेला असतो. ताराही तिच्या संसारात लक्ष देऊ लागते. पण तिला तिच्या चुकीची कायम रुखरुख लागून राहते. त्यामुळे एकदा घरात गॅस संपल्यानंतर तापलेल्या कढईत बंद गॅस करून सगळ्या पुऱ्या तळल्या जातात, तेव्हा अचानक तिच्या डोक्यात कल्पना येते. हे शक्य आहे मिशन मंगलच्या बाबतीत. !
आणि ती वेड्यासारखी सुट्टीच्या दिवशी धावत पळत धवनकडे जाते आणि अशक्यप्राय ते होम सायन्सने शक्य करून सांगते.
तेव्हा धवन तिच्या प्रयोगावर हसतो, कारण यान पाठविणे पुऱ्या तळण्याईतके सोपे नाही, अशा कल्पनेवर सुरू झालेला हा विचार आता मात्र धवनसह इस्रोचे प्रमुख ही गांभीर्याने घेऊ लागतात. तेव्हा धवन म्हणतो, "प्रत्येक शास्त्रीय यश हा पहिले विनोदच असतो."
प्रेक्षक संपूर्ण शास्त्रमय होऊन जातो.
अकरा महिन्यांचा कालावधी देऊन आणि आठशे करोडचे बजेट देऊन हे मिशन पूर्ण करण्याची परवानगी त्यांना मिळते. एवढ्या कमी बजेटमध्ये हे अशक्य असते. परंतु तरीही काम सुरू केले जाते. नासाच्या माणसाला मिशन मंगल या मिशनसाठी वैज्ञानिक टीम निवडण्याची जबाबदारी दिली जाते. तो काळजीपूर्वक अनुभव नसलेली टीम मिशनसाठी निवडतो.
टीमही सुरुवातीला धवन आणि ताराला वेड्यात काढू लागते. सतत अशक्यचं तुणतुणं वाजवू लागते.
कारण मंगल मिशन तारासाठी स्वप्न, पण इतरांसाठी नोकरी असते. त्यामुळे सुरुवातीला काम नीट होत नाही. लोकांप्रमाणे या शास्त्रज्ञांनाही नोकरीसारखे हे काम करून संपवायचं असतं.

शिवाय मंगळावर जाण्यासाठी अमेरिका ४ वेळा आणि रशिया ८ वेळा अयशस्वी ठरलेली असते..त्यामुळे अमेरिकेला नाही जमलं ते आपल्याला जमणार? हा अविश्वास सोबतीला असतो. आणि चंद्रावर जाणे सोप्पे आहे कारण चंद्र पृथ्वीचा उपग्रह पण मंगळवर जायला गुरुत्वाकर्षण शक्ती पार करावे लागते.
या सगळ्याची कल्पना या टीममधील प्रत्येकाला असते. त्यातच त्यांच्यासाठी दह्यात साखर म्हणून, शासनाकडून पैसे मिळण्यास नकार मिळतो, त्यामुळे चंद्रयान २ कडे लक्ष दिले जाते. त्यामुळे सगळे खोटे सांत्वन देऊन राजीनामा देतात.
तारा आणि राकेश हे स्वप्न सोडण्याच्या मार्गावर असतात. पण तेव्हा ताराच्या डोक्यात सुपीक कल्पना येते, धवन ही कल्पना इस्रो प्रमुखांना कळवतो, डॉ. अब्दुल कलाम यांच्या आदर्शाने सगळ्यांना कन्व्हेयन्स करतो. शेवटी साडेचारशे करोडमध्ये हे मिशन करायला इस्त्रोवाले परवानगी देतात. (मिशन पूर्ण होण्यासाठी ४४८ करोड लागतात. त्यामुळे मंगळ यान टीम प्रत्यक्षात दोन करोड सरकारला प्रामाणिकपणे रिटर्न करते.)
आणि सगळे खाच खळगे दूर करत मिशनला सुरुवात होते. मग 'हे अशक्य आहे' पासून सुरू झालेलं मिशन 'कॉपी दॅट' पर्यंत पोहोचते...
या मिशनमध्ये सहभागी झालेला रादर कुठलाही शास्त्रज्ञ डोक्याच्या प्रत्येक भागातील प्रत्येक कल्पनेला कोणत्या प्रकारे अनुभवतो हे पाहण्यासारख आहे. या सगळ्यामध्ये विद्याचा आत्मविश्वास आणि ऊर्जा... वाह... टाळ्या वाजवत इतक्या... आणि अक्षरशः थिएटरमध्ये खरंच तीन सिन्सच्यावेळी टाळ्या वाजवल्या जातात.

शेवटचा सिन :
प्रत्येक प्रयत्न आणि प्रत्येकाच्या मेहनतीनंतर जेव्हा ते तयार होतं तेव्हा किती भीती पण किती गर्व वाटतो मनात.

आणि तिन्ही गाण्याचे कौतुक करावे ते कमीच. प्रत्येक गाणं हे त्या मिशनला पूर्ण होण्याची फिलिंग देणारे आहे.
एवढे असूनही शेवटच्या क्षणी मात्र पावसामुळे आणि प्रतिकूल वातावरणामुळे मिशन पुढे ढकलले जाते. बॅक अप प्लॅन म्हणून पाच दिवसांचा कालावधी हातात असतो. तेवढ्या वेळात वातावरण स्वच्छ होणे आवश्यक असते. त्यामुळे पहिल्या दिवशी कामातून विश्रांती म्हणून पार्टी होते, सगळे रिलॅक्स होतात. पण लगातार पाचही दिवस पाऊस थांबत नाही..
५ नोव्हेंबर शेवटची संधी असते पण तेव्हाही पाऊस थांबलेला नसतो. सायंकाळच्या वेळी मिशन अबॉर्ट म्हणत सगळे माघारी जातात. कारण त्या दिवशी झाले नाही तर पुढचे कितीतरी वर्ष वातावरणामुळे शक्य होणार नसते. त्यामुळे ही शेवटची संधी असते, पण निसर्ग अडून असतो. धवन निराश होऊन परतू लागतो तोच, शेवटच्या क्षणी सगळे आकाश साफ होऊन सूर्य उगवतो. श्र्वासाचा विलंब न करता तो मिशन पुन्हा सुरू करतो... सगळ्या लेडीज तिथेच असतात. आणि

"गो सर, गो सर, गो सर... अँड येय... फायनली..."सगळीकडून आनंद, शुभेच्छा, अशक्य ते शक्य अशी खूप स्तुतीसुमने उधळली जातात.
२४ सप्टेंबर २०१४ ला योग्य वातावरण आणि योग्य वेळी यान मंगळावर पाठवले जाते.
पण...
पण...
एका पॉईंटला यान रेडिकल्सला धडकल्यामुळे गुरुत्वाकर्षण शक्ती पार करून मंगळाच्या कक्षेत गेले की नाही हे दिसनेच अशक्यप्राय होते.
मनात हुरहुर, उत्कंठा... शिवाय मनात एकदाही येत नाही की, हे मिशन तर यशस्वी झालंय माहिती ना आपल्याला तरी कशाला हुरहुर लावून घ्यायची. कारण चित्रपटाची आणि स्क्रीन प्लेची ताकद इथे कामी येते. स्क्रिन वरून नजर हटत नाही...
अँड दॅट हिरॉईक ममेंट !
एखाद्या साऊथ इंडियन चित्रपटमध्ये दाखवतात तसे
सॅटलाईट स्लो मोशन मध्ये एंट्री करते. आणि थिएटर चा माहोल पाहण्यासारखा असतो.
सगळ्यांचे आवंढे आणि मनातील धाकधूक शांत होते. आणि हळूहळू टाळ्यांचा आवाज येतो ...
काबिल हैं भारत तू! इतकं सुंदर वाटून जातं सगळचं.
फक्त शेवटी मोदींच्या आवाजातली ऑडीओ क्लिप दाखवायला नको होती, ना? एखाद्या शास्त्रज्ञाचा बाईट अजुन शोभा वाढवणारा ठरला असता, असे वाटले.
#पहावाअसानाही_पहावाचअसाआहे

- पूजा ढेरिंगे
अँड दॅट हिरॉईक ममेंट !
by
सूफ़ी
on
ऑगस्ट २१, २०१९
४४८ करोडात मंगळावर गेलेल्या यानाच्या एका चित्रपटाने आज बॉक्स ऑफिसवर ९२ करोडाच्या घरात धंदा केला. मंगळ यानावेळी चित्रपट आला असता तर स...