माझ्याबद्दल - Sufi

माझ्याबद्दल


मी...अशी... 
स्वत:चं नाव, व्यवसाय, कुटुंब याव्यतिरिक्त स्व:बद्दल जे असतं ते शोधतेय सध्या....
त्या शोधण्यात कधीतरी मनात चाललेली घुसमट, अचानक झालेला आनंद, वेगळे अनुभव, वास्तव आणि महत्वाचं म्हणजे  वाट्याला आलेले 'माझे' क्षण एखाद्या व्यक्तीसमोर व्यक्त करावेत या हेतूने हा ब्लॉग लिहिण्याचा खटाटोप...
मी एक विद्यार्थी आहे यापूढेही राहील. त्यामुळे लिखाणात असंख्य लॉजिकल, व्याकरणाच्या दृष्टीने चुका आढळतील पण भावनांच्या, विषयाच्या एकांगीपणात या चुका दिसणार नाहीच... 
त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या चांगल्या, वाईट अर्थात प्रामाणिक प्रतिक्रियेचं स्वागतच असेल...
त्यामुळे भेट देत रहा नेहमी...  मला आनंद असेल.
धन्यवाद !

४ टिप्पण्या:

  1. ज्या level ch tu लिहतेस ना ... Tevdh tujh vay pn nh ani anubhav pn...

    Ektar tu mankavadi aahes(दुसर्‍या च्या manatl olkhnari) ani dusarr mhanje tu life खूप बारीक observed kartes swatach अणि aajubaju ch.

    Tujhya लेखनाच्या premat आहे me����

    Asch लिहत रहा ..

    Gbu

    उत्तर द्याहटवा
  2. मी तुझ्याकडे या काळाची आणि येणाऱ्या काळाची एक उत्तम लेखिका म्हणून बघतोय.लिहित रहा.

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम यार पूजा.तुझा रविश कुमार वरील पहिला लेख वाचला.त्यानंतर लडाख च्या ररस्त्यात अडकलेली मैत्री वाचला.तुझ लिखाण आवडल,म्हणून तुझा ब्लॉग पाहिला आज.तुझ्या लिखाणाच्या प्रेमातच पडलोय मी.ऑफिस ची सर्व कामे बाजूला ठेऊन तुझे ब्लॉग वरील सर्व लेख वाचत बसलोय😊.अनेक लेखांमध्ये वाटत तू मन कवडी आहेस.माझ्या मनातील लिखाणात तू मांडलंय. तर काही लेखात पूर्णपणे नवीन माहिती देते.काही लेखामध्ये eg रविशजी चा लेख व्यक्तिमहात्म्य व इतर कांगोरे पटवून देते.तर कॉफी वरील लेखावरून स्वतःची कॉफी कोणती हा विचार करायला भाग पाडतेस.आज तरी 7 - 8 लेख वाचले.इतर वाचण्या अगोदर तुला लिहावा वाटलं राहवलं नाही.अशीच लिहीत रहा.यातून लेखानंतर एखादा पुस्तक लिहिशील अशी अपेक्षा करतो.

    उत्तर द्याहटवा
  4. या ब्लॉग ला आज प्रथमतः वाचले खरच तू ग्रेट आहेस तुझं लेखन अन् तुझे विचार खरच याला तोड नाही कधी कधी मला काय प्रतिक्रिया द्यावी सुचत नाही म्हणजे तुझा लेखन वाचावे अन् तुला याची पोचपावती म्हणून एक सुंदरशी प्रतिक्रिया द्यायलाही मला इतका विचार करावा लागतो की प्रतिक्रीया काय द्यावी जिथे तू इतकं उंचीच अप्रतिम lekhan kartes asach lihat Raha Kayam tu kharch great aahes

    उत्तर द्याहटवा