मे 2024 - Sufi

चित्रपट इमोशनल वाटेल आणि तसाच आहे ते नावावरुन कळतं. पण म्हणून त्याच त्या जुन्या धाटणीतला नाही. वेगळा प्लॉट आहे, ट्विस्ट आहे. हो मागण्या आणि म्हणणं आपल्या घरातल्या ज्येष्ठ सिनियर सिटिझन झालेल्या आई वडिलांचं आहे. महेश मांजरेकरने ज्या निगुतीने चित्रपट केला तो त्यांच्या वयाशी जेवढा संलग्न तेवढाच त्यांच्या फ्रेंड सर्कल मुळे जास्त मनापासून बनवला असे वाटते.  

आणि माझ्या वयातल्या मुला मुलींच्या वागणुकीचे आहे. पण त्यातला एकही शब्द खोटा नाही. शरीर थकल्यावर वृद्धांकडे कितीही पैसे असले तरी विचारपूस करणारी त्यांची अशी माणसं लागतात आणि दुर्दैवाने त्यांची अपत्य असलेल्या आपल्याला ही गोष्ट कळत नाही.


आई वडील आपल्याला मोठं करता. पैसे हातात आले की आपण म्हणू लागतो उपकार थोडी केले. सगळेच करतात. पण जर तुम्ही सामंजस्याचा त्या टप्प्यावर आले असाल तर तुम्हाला हे कळेल की आपल्या हातून कोणासाठी लवकर काही केलं जात नाही. त्यामुळे सगळेच नाही करत. 


हो हे चक्र आहे. आज आपण कोणाचे तरी मुल आहोत. उद्या आपली मुलं होऊन आपण आई वडील होणार आहोत. त्यामुळेच कदाचित म्हणत असावे की, इथे केलेलं इथेच फेडावे लागेल. 

वृद्ध होणाऱ्या आई वडिलांसाठी मूल-सून, मुलगी- जावई ही नाती खूप महत्त्वाची असतात. कारण वृद्ध होतानाचा प्रवास खूप धीमा असतो. 


लग्न झाल्यावर दोघांचे आई वडील तेवढेच महत्त्वाचे ही जाणीव पैसा कमावताना जोडप्याच्या मनात असायला हवी. आपण कमवायला लागतो म्हणजे काही नवीन करत नसतो. कारण त्यांनी आपलं वय आधीच जगून घेतलंय त्यामुळे त्यांना सांगून पाहिले तर ते समजून घेतात. 

पैसे हातात येऊ लागले की माणूस आपल्या माणसांशी कसा वागतो यावर तो माणूस सेल्फिश आहे की नाही ठरत असं मला वाटतं. 


धावपळीचा जगात हो थोडं वेळ मिळणं कठीण होतं पण इतकं कोरडं जगून काय करायचं? जेवढा वेळ मोबाईलवर रिल बघण्यात जातो तेवढ्यात एक कॉल करुन होतो. हो मान्य आहे बऱ्याचदा घरचे त्या एका कॉल मध्ये काही टेन्शन देणारं सांगू शकता पण म्हणून तुम्ही टाळण्यामुळे काय होऊ शकतं याचा रियालिटी चेक देणारा “जूना फर्निचर” चित्रपट आहे. मला तर आनंद आहे असे चित्रपट बघायला आजही थिएटर फुल होतं आणि काहीजण फॅमिलीसह, काही तरुण तरुणाई, काही सिनियर सिटिझन कपल्स आलेले. 


सगळे म्हणता मुलाच्या आई वडिलांशी सून नीट वागत नाही. त्यामुळे सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात जावे लागते. अशा अनेक सूना आहे ज्यांच्यामुळे सासू सासऱ्यांना त्यांचच घर खायला उठले. का मुलीसुद्धा स्वतःहून सासरचे घर आपलेस करुन घेत नाही. मात्र मैत्रिणींशी बोलल्यावर त्यांचं म्हणणं असतं, सासू केवळ सुनेसारखं कामापुरते वागते. सासूनेही मायेने जवळ घेतल तर सुनेला घर आपलेसे वाटेल. 

आणि जसं काही सूनांमुळे मुलाच्या आई वडिलांना त्रास सहन करायला लागतो. मुलाचे आई वडील त्याच्या दूर होता, तसेच जावयामुळे सुद्धा अनेक मुली त्यांच्या आई पासून दूर होतात. मुलगी सासरी जाते त्यामुळे आई मुलीची ताटातूट होते. मात्र तरीही मुलीने आईला फोन केला तरी काही नवऱ्यांना आणि सासरच्यांना मान्य नसतं. 


बऱ्याचदा मुलाच्या किंवा मुलीच्या घरी भांडणं झाली आणि अशावेळी ती मुलगा किंवा मुलगी इमोशनल असून दुःखी होते. मात्र नेमकं अशावेळी आपण संवेदनशील होताना चुकीचा खांदा मिळाला की अनेक चांगली नाती सहज सांधता येणारी तुटतात. काही नवरा बायकोंचे नाते तसे असते. सासरी भांडण सुरू म्हणून बायको नवऱ्याला अजून पेटवून देते किंवा माहेरी भांडणं सुरु तर नवरा हा बायकोला विरोधात पेटवून देणार. त्यामुळे जर आपल्याला नाती जोडता येत नसतील तर किमान तोडू तरी नाही. आपल्याला वाईट वाटत असताना चुकीचे सल्ले मिळाले की माणसाला वाईट वागण्याचा आत्मविश्वास वाढतो आणि तो त्या नात्यात झालेल्या गोष्टी नीट करण्यास पुढाकारही नाही घेत. नवरा बायको म्हणून आपण दोन्ही घरं जपण्याचा प्रयत्न ठेवायला हवा. 


दूर राहत असल्यावर तर नक्कीच आपल्या मनात बऱ्याचदा आई वडिलांची आठवण येते. सुरुवातीला आपण फोन करतो, भेटायला जातो. पण एका काळानंतर आपण आपल्याला खोटा दिलासा देऊ लागतो. कारण या वयात आपल्या आई वडिलांचे डायलॉग इमोशनल अत्याचार आणि गिल्ट वाटू लागतो. पण आपण तिथेही स्वतःला दिलासा देतो. आई वडीलच आहे घेतील समजून म्हणू लागतो. पण तसं नसतं. याचंही प्रैक्टिकल जुने फर्निचरमध्ये दाखवले आहे. 


हा सिनेमा तसा जास्त चालणार नाही. कारण आपल्याकडे अशा सिनेमांना लिमिटेडच प्रेक्षक येतो. पण सीनियर सिटिजनच्या आणि आई वडिलांच्या वेदना पोहोचवण्याचा आणि तुम्ही मोठव

झाले तरी आई वडिलांकडे दुर्लक्ष करू नका हे रिमाइंडर देण्याचा प्रयत्न खरच खूप उत्तम केला. 


: पूजा ढेरिंगे

#जुनेफर्निचर 

जुने फर्निचर !

by on मे ०१, २०२४
चित्रपट इमोशनल वाटेल आणि तसाच आहे ते नावावरुन कळतं. पण म्हणून त्याच त्या जुन्या धाटणीतला नाही. वेगळा प्लॉट आहे, ट्विस्ट आहे. हो मागण्या आणि ...