जेव्हा मी सगळ्ळच खरं बोलते ...!!! - Sufi

जेव्हा मी सगळ्ळच खरं बोलते ...!!!

कालच्या रात्री तु मला प्रश्न विचारलास, "व्हाय डू यु लव्व्ह मी ...? दरवेळी टाळते आज तुला सांगावच लागेल, तू माझ्यावर प्रेम का करतेस ? कधीतरी मोकळेपणाने बोल नं.... एखादं तरी वॅलीड कारण...?"
त्या क्षणी मनात असलेली इतक्या दिवसाची बोळा केलेली भावनांची चीठुरं धाडसानं बाहेर काढावी आणि खरं बोलावं त्यातली मी नव्हते. 
त्यामुळे मी तुला म्हणणार नव्हते की,   
                "तू ज्या पद्धतीने सगळ्या मुलींच्या प्रेमात पडत होता तुझं ते प्रेमात पडणं मला तुझ्या प्रेमात पाडत होतं......माझं प्रेम होतं कित्येकांवर वगैरे याचं तुला काहीच नसायचं, हि तुझी बेफिकिरी मला तुझ्या प्रेमात पाडत होती.... 
एकतर तू माझा मित्र नव्हता, ना आडवळणी शेजारी होता. तू एक दिवस रस्ता चुकला, मग पुढचे रस्ते मीही चुकवत गेले. ते मुद्दाम चुकणं खरंतर जास्त आनंद देत होतं....
त्यांनतर मला बऱ्याचदा तू आवडला होता..... जेव्हा तू सगळ्यात सुंदर दिसणाऱ्या अंजलीला घट्ट जवळ घेतलं होतंस, तुझ्या प्रेमात म्हणून मी तुमचा तो हार्मोन चेंजिंग आकर्षणाचा क्षण हरामीसारखा एन्जॉय केला होता, मी तेव्हाही तुझ्या  प्रेमातच होते..... 
मला तेव्हाही तू आवडला होता, जेव्हा तू तुझ्यासाठी कुरूप दिसणाऱ्या मेधाला ती रडत असताना खांदा दिला होता, तिला समजावत असताना ती डान्स पे चान्स म्हणून तुला मिठीत घेत होती.... मी तेव्हाही प्रेमात पडले होते, जेव्हा तू मला तुझी अटेन्डन्स लावायला लावत होतास. तू सांगितलेलं प्रत्येक काम मी भांबरटासारखं करत होते, मी तेव्हाही तुझ्या  प्रेमातच होते....
                "आणि तो दिवस आठवतो...? मुव्हीचा.. ? जेव्हा माझ्या शरीराने तुझ्या शरीराच्या आतपर्यंत असलेल्या त्या प्रियकराला आव्हान दिलं होतं, मी तेव्हाही तुझ्या प्रेमातच होते बहुदा.....  मुव्ही बघताना तिथे सुरु झालेल्या किसिंग सीननंतर तू माझ्या ओठांकडे पाहत राहिला होतास, मी तेव्हाही तुझ्या

प्रेमातच होते...... 
तुझं माझ्याकडे पहिल्यांदा त्या नजरेनं बघणं माझ्या हार्मोन्सला न उत्तेजित करणारं नव्हतच. कदाचित तुझं ते 'फक्त' पाहणं मला अनुभवायचं नव्हतं म्हणून मी त्याच उत्तेजित नजरेने तुझ्याकडे पाहिलं होतं, मी तेव्हाही तुझ्या प्रेमातच होते. माझ्या त्या 'नुसतं' बघण्यानं तुझ्या शरीरातल्या सगळ्या कप्प्यांना झणझणीत कंप येत होता. मला तो क्षण हवा होता आणि त्याचवेळी तू मौक्याचं सोनं केलं होतंस, मी तेव्हाही तुझ्या प्रेमात होते....
थिएटरच्या काळोखात तू माझ्या एका बाजूला वळलेल्या केसांत सपकन तुझा हात सरकवत नेलास, दुसऱ्या हाताने डोके वर करू पाहणाऱ्या स्तनांना आधार देऊन कुरवाळून तुझ्या जिभेच्या मऊशार कुंचल्याने डोळे झाकून रंगोटीनं तू जे रेखाटत होतास, मी तेव्हाही खोलवर तुझ्या  प्रेमात होते. त्यानंतर तुझ्या खरबडीत ओठांनी त्यांना दातात पकडणं, आणि दुसरा हात माझ्या केसांत घालून मला घट्ट जवळ ओढणं. या सगळ्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडत गेले, विरघळत गेले 
एका निष्पाप झऱ्यासारखी.... पण स्साला तो खुर्चीचा दांडा मध्येच येत राहिला....     
          आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा आपलं भेटणं झालं ते मुव्हीच्या उद्देशानेच. त्यात ओढ शरीराची होती. पण माझं शरीर ते सगळं सेलिब्रेट करत होतं. त्याचं तसं सुडौल असणं, पूर्ण तुझ्या स्वाधीन होणं, तुझ्याबरोबरच्या त्या मुव्हीला जाण्यात एक वेगळी मजा यायला लागली होती. आता आता तर टोट्टल सवय झालीय त्याची. व्यसन म्हणून टाक !!!!! आपल्या या व्यसनावर माझा हुरहुरणारा श्वास प्रेम करू लागलाय म्हणून तू आवडला."

             "यावर तू म्हणेल, 'हे प्रेम नाही. तू तर माझ्या शरीरावर प्रेम करतेयस...' 
माझं उत्तर बालिश असेल,'तुझं शरीर तुझ्यातून वेगळं आहे का...?'
तरीही तुझं समाधान झालेलं नसणार...!!
               तेव्हा मी म्हणेल,"दोन्ही हातांनी तुझ्या शरीराला  मागून पकडून कस्सकन 
जवळ घेतल्यानंतर जेव्हा हळुवार माझ्या स्तनांचा स्पर्श तुझ्या छातीला होतो, ते शर्टाचं बटन काज्यात अडकावं इतकं करकचून जवळ आल्यानंतरही त्या घट्टपणातून काही जागा सुटतात त्या सुटलेल्या जागांमध्ये हे आकर्षणाचं प्रेम लपतं."
             'प्रेम आकर्षणाशिवाय पूर्ण होणारंय, खरंच काय... ?' हा खवचट प्रश्न तुला न विचारता, त्या वेळी तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायचं होतं म्हणून, "प्रेम आहे ते. त्याला कारण दिलं तर ते प्रेम कसलं... ?" या एका ओळीत मी माझ्या शरीराचं तुझ्यावर असलेलं आकर्षण चालाखीनं बंदिस्त केलं. 


५ टिप्पण्या:

  1. वाह, मी लिखाणाच्या प्रेमात पडलो, अक्षरशः । एक एक शब्द रोमांचित करत आहे. कमालीचं आहे हे cozzy ����

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम खूपच अप्रतिम... लिहताना इतके निर्मळ काही असेल तर ती तुमची लेखणी..हा जरा संकोच वाटतो पण हे आहेच की प्रामाणिक मनाने लिहले की भावना भडकत नाहीत..हे जाणवलं बा बाकी मी असले काही वाचण्यात नवीन नाही पण प्रतिक्रिया द्यावी हे तुमच्या लेखणीच्या जादू मुळेच शक्य होत आहे...

    उत्तर द्याहटवा