शाईतल्या ईकारात 'तू '... - Sufi

शाईतल्या ईकारात 'तू '...



आज खरं सांगू ??? तू एकदा प्रश्न विचारलेलास..."इतकं कसं लिहितेस तू.? तेही माझ्यासारख्या विषयावर...?"
आज त्याचं उत्तर द्यावसं वाटतंय...
             जेव्हा वेगळे झालो आपण... आठवण तुझी इतकी घट्ट यायची की त्या आठवणींची ती मिठी सुटायचीच नाही किंवा कदाचित मला ती सोडावीशीच वाटायची नाही... तुझं इतक्क जीवजाणं व्यसन लागलं होतं की त्याची नशा उतरवावी वाटायची नाही. रात्र-रात्र थरकाप व्हायचा 'तू सोबत नाही' या भावनेने ... तो थरकाप तू तुझ्या हातात घ्यावा त्यासाठी तरी तू सोबत असावा वाटायचास...
          अनेकदा खोटे भास मी स्वतःच्या मनाला खरे करून सांगितले आठवतंय मला कारण माझा विश्वास होता, "एकदा खरं प्रेम केलं की तिथे ब्रेकअपसारखे नसते उपद्व्याप नसतातच..  प्रेमच प्रेम असतं. सुरुवातीलाही आणि शेवटपर्यंतही." वाटलं होतं, अशावेळी तरी तू येऊन माझ्या बोलण्याला खरं करशील.... पण हळूहळू तू त्या प्रत्येक ठिकाणी कुठेच आला नाहीस, तेव्हा मी लपेटून घ्यायला लागले स्वतःला, माझ्या लेखनीच्या आकारात, उकारात, शब्दांत ... त्यांच्या अस्तित्वाने किमान आपल्यातली ती सतत पोखरणारी शांतता मला तोडायची होती म्हणून स्वतःला मी गुरफटवत गेले त्या निळ्या काळ्या शाईच्या गर्तेत ...
         तू त्या कल्पनेतही माझ्या कित्ती जवळ असायचास वेड्या. जसा खरोखर सोबत आहेस__फक्त एका श्वासाच काय ते अंतर... त्या कल्पनेतही स्वतःचाच इतका हेवा वाटायचा आणि त्यामुळे तिथेच अशा खुऊपशा रात्री मी अशाच निवाआआअंत घालवायचे. आणि त्या चार भिंतीत आपलं दोघांमधलं 'लग जा गले' शोधत राहायचे...
         तुला आठवतंय, त्यावेळी मी तुला "माझ्या घरी येऊन मला मिठीत घेऊन दाखव मग मानेल तुझ्या प्रेमाला" म्हटलेलं... त्यावेळी नेमकं घरी कुणी नसल्याचा स्मार्ट डाव तू खेळला होतास शहाण्या ... मी चितपट झाले होते, संपले होते तुझ्या त्या एका प्रेमातल्या कटाक्षाने नि नंतरच्या अघुर्‍या "तू माझीच आहेस फक्त कळलं.?" या भावनेने ...
         सध्या भोवती वास्तवात नाहीयेस तू ... पण या स्वतःला स्वतःच्या लिखाणात लपेटून घेतल्यामुळे तिथे तू नसूनही तू माझा आहेस आणि तू नसल्याचे दुख मला तिथे तू नसतानाही त्यातून बाहेर पडल्यावर खुश करून पाठवत आहे... तुला लपेटण्यापेक्षा या शाईला लपेटून मी तुला 'तू माझा असल्याचा' हक्क तर दाखवूच शकते, जी वास्तवात एक कल्पना आहे...!!!
शेवटच एक सांगू...?
काल शेवटचं ठरलंय...
काल तुझ्या त्या 'एका आठवणीबरोबर' मी कितीतरी वेळ खेळत बसले होते ...
थोड्या गप्पाही झाल्या...
तुझ्या येण्याची आम्ही दोघींनी आतुरतेने वाट पाहिली ...
मी थोड़ी जास्तच नेहमीसारखं!
न राहवून ती म्हणालीच, "बावळट आहेस का गं तू.? तो आला असता तर मी आले असते का.? तू इतकी आंधळेपणाने कशी कुणाची होऊ शकतेस.? ... "
ती आपलं बोलत राहिली, बोलत राहिली नि मी तिच्या त्या बोलण्यातही तुझं 'येणं' शोधत राहिले...
शेवट निघताना तटस्थपणे तीच म्हणाली;
            यापुढे लक्षात ठेव,
आपण तिघे एका ठिकाणी नसूच शकतो ... स्पष्ट नाही...
त्यामुळे स्विकारून टाक त्याचं माझ्यातलं असणं,
तो फक्त माझ्यात असेल यापुढे आता ... आणि यार्र्र आता बस कर हा आठवणींचा पसारा, तोचतोपणा आणि बरोबरची ती जुनी शाई. आऊटडेटेड झाली आता...
विचार मीही तोच करायला लागलेय !
कारण, आठवणींचा समुद्र तुझा अंगावर येतोय आता,
माझ्यासकट माझं पूर्णत्वच घेऊन जातोतू.
सवड दे मला थोडीशी,
घट्ट रुतून बसते किनाऱ्याला.
तीर स्वतःचे बांधायचे आहे,
त्यात राहतील तुझ्या आठवणी, मीही पूर्ण !

६ टिप्पण्या:

  1. अप्रतिम लिहिलंयस
    लेखणीतुन मानाचं आभाळ कागदावर उतरलं
    'एका आठवणीबरोबर' मी कितीतरी वेळ खेळत बसले होते ... हे जास्त भावलं

    उत्तर द्याहटवा
  2. तू खरोखरच एक भलतेच मिश्रण आहेस यार भिनत जाणार मनातल्या मनात रुतबा राखून जगणार👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✍️❤️😘😍👍

    उत्तर द्याहटवा
  3. भावनांच्या सागरात जेंव्हा माणूस बुडून जातो तेंव्हा पाठीमागे त्याचे अस्तित्व उरत नाही , उरतात फक्त त्याच्या आठवणी... 🖤🖤🖤

    उत्तर द्याहटवा
  4. सुंदर, तिच्या नासण्याचासुद्धा त्रास होत नाही कारण तिला वेळोवेळी वाटेल तेव्हां मी माझ्या शाईतून माझं केलंय, त्यासाठी तिच्या येण्याची किंवा असण्याची गरज भासत नाही. तिच्यावर अवलंबून पण राहावं लागतं नाही, का कधी वाट पाहावी लागत नाही. ती शाईची चाहूल लागताच एकेक पाउल टाकत येते माझ्याकडे माझी होण्यासाठी....

    उत्तर द्याहटवा
  5. आता तर शब्दांनी जादू केली अन अनेक प्रश्नांची मोळी गळ्यात बांधली.. अजून पोस्ट राहिल्या वाचायच्या बघू ते प्रश्न सुटतात की अजून वाढतात.. पण लेखणीत जादू आहे हा... कमालीची जादू...

    उत्तर द्याहटवा
  6. अलवार वाऱ्याची झुळूक यावी अन् तिनं स्पर्शून जावं असे तुझे लेखन हे तर खूप सुंदर आठवणी अन् माझं ही असच काहीस आहे खूप सुंदर असते या आठवणींच्या सानिध्यात गुंतने....

    उत्तर द्याहटवा