तुला स्पर्श कळायला हवा... - Sufi

तुला स्पर्श कळायला हवा...


स्पर्श वेगळा, प्रेम वेगळं .
ती रात्रही वेगळीच होती.
त्याने केलेला स्पर्श अंगाला झाला मनाला नाही.
तो स्पर्श माझ्या संवेदनेला कुरवाळणारा नसून त्याची गरज भागवणारा होता....
आणि शहारा येण्याऐवजी घीण आली मला ...
मी जोरात किंचाळले,"दुर हो माझ्यापासून....
आज तुझे हात घाणेरडे आहेत, कारण आज तुझं मन नाही तुझं शरीर मला स्पर्श करतंय.
इंटिमसी नाही, आज ओढाताण आहे तुझ्या श्वासांत.
मला दुर लोट आताच्या आता नाहीतर तुझ्या श्वासांत मी गुदमरून जाईल....."
"अग्ग .. आत्ताच तु म्हणालीस ना, मला सुरक्षित वाटतंय तुझ्याबरोबर, मग ?
"सुरक्षित वाटतं म्हणजे लगेच तु तुझ्यातल्या वासनेला जागं करायचं नि माझ्या परवानगीविना जवळ खेचायचं मला ?"
तुझ्यासोबत सुरक्षित वाटतं म्हटलं खरं .... पण तो क्षण तु जपावा म्हणून.... कदाचित तु त्याचा फायदा घेतोयस (?)"
क्षणभर माझाच माझ्यावर विश्वास बसेना....ज्याच्यावर निरागस प्रेम केलं तोच .........?
पेटलेल्या या वणव्यानंतर त्याला बाहेर काढून मी घट्ट दार लावून घेतलं......
अपेक्षप्रमाणे दरवाजात रडत बसण्यापेक्षा चुकीच्या व्यक्तीसाठी घरंगळलेले अश्रू 'पुसून' टाकले. सुस्कारा सोडला नि स्वतःच्यादोन्ही हाताने स्वतःला कुशीत घेतलं, कुरवाळलं त्याच्याविना...... ❤️




९ टिप्पण्या:

  1. काही वेळेस खरचं प्रश्न पडतो...? काय बोलू नेमके.... पण जिथे हा "काय बोलू" हा प्रश्न निर्माण होतो, नाही बोलणचं ठीक असते. निशब्द :)

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आणि नेहमीप्रमाणे मी तुझ्या कमेंन्ट्सवर निशब्द होते.. Thank You ☺️

      हटवा
  2. अनेकींच्या मनातील भावनांना नेमक्या शब्दांत व्यक्त केलंस. छानच !

    उत्तर द्याहटवा
  3. प्रश्न असा
    मनाची आणि शरीराची गरज एकच झालीय खूप ठिकाणी मोठ्या प्रमाणावर
    चूक कुणाची....... त्या माणसाची कि त्या केविलवाणी अवस्थेची

    उत्तर द्याहटवा

  4. अप्रतिम लिहले यात वादच नाही .
    बऱ्याजदा भावना ओळखताना चूक होते...

    उत्तर द्याहटवा
  5. खुप सुंदर खरतर काय व्यक्त व्हावे सुचेना

    उत्तर द्याहटवा