जून 2018 - Sufi
"स्पर्शून माझ्या सर्वांगाला ... 

सुगंध तुझा अलवार आहे ... 

तू घे सावरून स्वतःला...  

मला सावरने आज शक्य नाही... "
मी पावसाबरोबरच बोलत होते. पर्याय नव्हता नं, सोबत्याने दुसरा पर्याय तरी ठेवला होता का?  सोबत्याला आज भेटणं शक्य नव्हतं म्हणे...
त्यामुळे मी पावसाशी बोलूनच थोड्याशा तनहाईचं सेलेब्रेशन करत होते ...;.
पावसा, चेहर्यावरून अलवार सरकून आतपर्यन्त माझ्या नसनसात गेलास तू ...
हात मोकळे करून सारे विश्व कवेत घेत होते मी ...
त्यात हा विजांचा कडकडाट, पावसा तू मला घाबरून देत होतास ... एकटी असल्याचा हा जुलमी फायदा तू घेत होतास, पण कोणाला काय पडलं नं! मी या रोमॅन्टिकपणात माझा 'हक्क' मिस्स करत होते...
त्या थंडाव्याने गारठून मी जात होते ...
तरी मन माझे मानत नव्हते पावसा तुला सोडायला ...
हट्ट सोबत्याचे कितीदा पुरवून तुझ्यात ना भिजले मी ...
माझे हे तुझ्यात भिजणे किती त्याला मोहित करायचे माहिते.? पण माझ्यात विरघळायचा हक्क फक्त त्याचा, म्हणून तुझ्या विजेपेक्षाही कडाडून चिडायचा हा तुझ्यावर...
पण मी अशी गुंतलेले केस मोकळे करत यायचे, ते तो पहातच राहायचा.... त्यामुळे का होईना थोडा आवडायचास त्याला तु... काय म्हणायचा माहिते, शब्दांनी खोटं नाही बोलवत म्हणणार होतो सुंदर दिसतेय पण यार्र मादक दिसतेयस तू. सांभाळ स्वतःला... पण्ण केसांतून झटकताना हळूहळू गारातून पडणारे थेंब त्यालाच इतके माझ्याजवळ ओढायचे की मला त्याला सांभाळावं लागायचं... आणि त्याला सांभाळण्याच्या त्या प्लानमधून जवळ घेण्याच्या त्याच्या आकर्षणात मी स्वतःला शातीरपणे सोडवून जी घ्यायचे ...
माझ्या अंगावर थेंब पडायचे, तो त्या पावसाला नावे ठेवायचास ..." हक्क तुझ्यावर फक्त माझा आहे" कित्ती आतून तो म्हणायचा....अशा क्षणी माझं तुझ्यावरचं प्रेम ऊफाळुन यायचं ते इतकं...
आज तू पडताना झेलत होते पावसा तुझे  टभुऱे थेंब  ... तरीही सोबत्या तुला शोधत होते मी  कुठेतरी मागे पुढे सगळीकडे ...
पावसात हे सगळं जे होतं जन्नत होतं .. या आजच्या पावसात तोच नव्हता ... अपूर्ण काय ते हेच होतं ...!
डोळे बंद करून पावसाला मी संपूर्ण चेहर्यावर, अंगावर, मनापर्यंतही पोहोचू दिलं ...वाटलं चिडचिड होऊन तो भेटायला तरी येईल...  पण ... तो आलाच नाही.
शेवटी वैतागून, थंडीने कडकडून आमच्या नेहमीच्या टपरीवर त्याच्या विचारात त्याचा संताप करत एक फक्कड अद्रक चाय सांगितली... "क्या म्याडम, साब नहीं आयें...?" नेमक्का चायवाला बोलला...
"याला आजच साब आठवतोय नेमका..."
मी चहावाल्याला सर्रळ इग्नोर केलं....
केस मोकळे करून दातात क्लिप अडकवून बांधता बांधता विचारच करत होते, त्या विचारांना बाजूला सारून बघते तर्र काय ...? समोर.... तो .... :O
व्हॉट्ट.... I was like what the ***  तोंड उघडं ते उघडंच, तोंडातला क्लिप जसाच्या तसा खाली पडला पण्ण मग वाटलं भास होऊच शकतो हा गेला खड्ड्यात मला काय फरक पडत नाही... मी इग्नोर केलं... पुन्हा खरचं तो होता का या अनपेक्षेने पहायला गेले ... तो खर्रच... खर्रच खर्रच तो होता....
पण्ण त्यातही मला आठवलं मी चिडलेली आहे, त्यामुळे सगळी एक्साईटमेन्ट सगळे किसेस हग्ज दूर डोंगरावर नेऊन ठेवत मी त्याला म्हटलं,
"उशीर झाला तुला ... एक पाऊस उधार ठेवला तुझ्यावर आज मी ...निघते बाय भेटू पुन्हा तुझ्या सवडीने!'  ... नि निघणार तोच मागून हात धरून तो म्हणाला,
"ए- जान-ए-मन... पाऊस आहे तो आणि मी 'मी' आहे कळलं.... त्या पावसाला माझ्याशी जिंकण सोप्प नाहीए हे पक्क डोक्यात फिट करून घे.?"
त्याच आनंदाला लपवून चिडक्या सुरात मीही म्हटलं "ए चल्ल हट्ट जेअलस मुलगा.. दुर होके भी एहसास उसका आबाद हैं... तु आत्ता आलयंस पावसातही आणि आयुष्यातही." 
"ए - नाजनीन! कसं आहे ना... असे कित्येक क्षण माझ्या वाट्याला आले आहेत, ज्यात फक्त तू आणि मीच होतो ... तो कितीही जूना असला तरी त्याला 'मी' होणं शक्य नाही आणि तुला त्याच्यावर ' माझ्यावर करते ते प्रेम' करणं शक्य नाही....आणि उलट खरं सांगायचं तर आज थोडावेळासाठी काय त्याला 'तुझ असणं उधार दिलं' इतकंच काय घडलं.. त्यामुळे उधारी त्याची माझ्याकडे झालीय ... त्यामुळे तू जाऊ नकोस लग्गेच तो आत्ता पडेल आणि पडेलच देखना तुम .. ठरलंय तसं."
मी स्तब्ध म्हणजे त्याच्या त्या बोलण्याने काय बोलावं समजेना...  चिडचिड कद्धिच संपली होती. मला खूप नवं वाटत होतं... मी त्याच्या नजरेशी नजरच मिळवू शकत नव्हते, कारण मुळात हे सगळं फार परीकथेसारखं असलं तरी खोटं वाटत होतं मला..
अशातच इकडे तिकडे पाहत होते, त्याच्यावर चिडून आणिया निसर्गावरही... तितक्यात  वाऱ्याने काय ते सुखद खुणावलं, वार्याच्या थंडाव्यात विश्वास नाही बसला पण हळूहळू पावसाचे थेंब मला स्पर्शून जाऊ लागले ... वाढून विरळविरळ म्हणत त्या थेंबानी मला तो समोर दिसेनासा झाला... पण पावसाच्या या जोरदार मीठीत मला स्पर्श भावना आणि श्वासांत सुवास होता त्याने घट्ट पकडलेल्या माझ्या हातांचा... त्याचं  पडणं माझ्या नजरेगणिक जास्त जास्त वाढायला लागलं होतं. मी चिडलेली हळूहळू ओसरायला लागले होते पण मनातून ठरलं होतं त्याच्यासमोर ओसरायचं नाहीचे...
हळूहळू हळूहळू येणारा तो आता पूर्ण धाडधाड कोसळायला लागला... आणि थोड्यावेळाने भानावर येऊन शेजारी याच्याकडे पाहिलं, गर्वाने निरागसपणे काय पाहत होता तो माझ्याकडे मला समजलं नाही पण्ण त्या भर टपरीवर, मोकळ्या आसमंतात, माणसांच्या गर्दीत, माझ्या केसांतून तरळणार्या केसांच्या बटेला मागे सारत," माफ कर ना जीवा ¡ .... पुन्हा चुकूनही ही चूक नाही होणार .... एक्स्ट्रीअमली सॉरी नं ..."
"ही चूक नाही म्हणजे नवी चूक करणार तु ..." मी जोरात खोटंखोटं रागावले...
डोळे बारीक केविलवाणे करून पाहतच राहिला की तो .... आणि एकसाथ जे हसलो दोघे ....
पावसा खास है तू !
दोघांनी सोबत वरती पाहीलं त्याने माझ्यासोबत पावसाला अनुभवलं नि
' तू आज पुन्हा एकत्र आणलंस आम्हाला.' म्हणून मी पावसाचा शुक्रिया अदा केला
"उधारी आमच्याकडे तुझी राहीली नेहमीसारखीच." म्हणून अलविदा करत बिनदिक्कत स्वार्थी बनून मी याच्या मीठीत विसरून गेले  पावसालाही....


उधार पाऊस ...!

by on जून २१, २०१८
"स्पर्शून माझ्या सर्वांगाला ...  सुगंध तुझा अलवार आहे ...  तू घे सावरून स्वतःला...   मला सावरने आज शक्य नाही... " मी...

"वडील (?)
कोण आहे हा व्यक्ती ?
शब्द नवा नाहीये पण माझ्यासाठी कोण आहे ... ?
त्याची माझ्या आयुष्यातली भूमिका काय आहे..?"
सगळं केवढं वेगळं आहे हे ....
मला या शब्दाचा त्रास होतोय हो ...!   ज़रा शांत बसाल तुम्ही? 
नका विचारू मला असले पाया नसलेले प्रश्न .... 
इतके दिवस त्रास नव्हता होत. मी बोथट झाले होते, पण आज अचानक शरीरातून सळसळती वीज जावी, दुखत्या भागावर घणाघाती आघात व्हावा तसं अंग आतून युद्ध करून उठलं, जेव्हा ऑडिटमधे मला 'वडिलांवर' बोलण्यास संगितले...
काय वेगळं आयुष्य आहे ना हे ...? म्हणजे​ नटसम्राटमध्ये म्हटलं तसं लुळ्यालाच चप्पल नसल्याच दुःख सांगावं, तसं आज एवढा सगळा स्टाफ सोडून वडिलांवर फ़क्त मीच बोलावं हे माझ्या वाटणीला यावं......? 
त्यावेळी हळवी वगैरे मुळीच झाले नाही मी ...एखादी जखम लहानपणापासून वाट्याला आली कि तिचं दुःख  तर होतंच नाही पण ती तिथे आहे कि नाही हेही  आयुष्याच्या लढाईत विसरून जातो, माझ्या आयुष्यात बापाचंही तसंच झालं एखाद्या जखमेप्रमाणे... 
पण खंबीर होऊन वाट्याला आलेला तो टास्क मी, वॉशरूममध्ये जाऊन मनात एकच विचार केला, "माझ्यासमोर असणाऱ्या या प्रत्येकाकडे आई-वडील या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, पण माझ्या आयुष्यात असणारी एकच व्यक्ती केवळ माझी आईच नाही तर ती माझी वडीलही आहे आणि जी आई मुलीचे वडील होऊ शकते ती मग कुठलीही भूमिका सहज निभावू शकते ...."
पण मी त्यांना असं संगितल की माझी आईच माझे वडील आहे तर.. ?
ते कसं  वाटेल ऐकायला? विशेष म्हणजे अनेकानेक मानसिक प्रश्नार्थक नजरांना मला सामोरं जावं लागणार तेव्हा त्यांना आश्चर्य नाही वाटणार किंवा वाटेलही पण ....
पण माझ्यासाठी त्यांचं आश्चर्य गौर करण्यासारख असेल? अज्जीबात नाही कारण त्यापेक्षा माझ्या या 'विश्वानं' हे सगळ आतापर्यंत निभावून आणणं, एक आई आणि एक बाई म्हणून ते कोण्या वीरपुरुषाहून कमी धैऱ्याचं नाही ठरणार! मी ते सांगण्यातच धन्यता मानेल... 
"त्रास होतो आता.?" बॅकग्राऊंडमधून प्रश्न येईल. 
"नाही रे ! त्रास नाही होतंय आता, सवय झाली नां... फक्त लहानपणी वडील शोधला, नाही मिळाला कुठेच. मग खोट्या आशांवर जगत राहीले. आयुष्य मोठं होत गेलं. मग आजूबाजूचे प्रश्न करायला लागले. त्यांच्या प्रश्नांनी मला कोड्यात पडायला व्हायचं.
मागे एकदा आईला विचारलंही, "आई, बाबा कुठे असतात गं ? ..... ती शांत राहिली आणि मी तिची शांतता समजण्याइतकी मोठी झालेली.  त्यामुळे मी तोच प्रश्न पुन्हा उच्चारला नाही. आयुष्यात कद्धीच!
बाबा होते ना... त्या दिवशी खरंतर त्यांना मिठीत घ्यायचं होत, थोडं सांगायचही होतं माझ्या भविष्याबद्दल, माझ्या जोडीदाराबद्दलही. पण त्यांना शेजारच्यांच लग्न पार पाडायच होतं, शिवाय जोशींची मुंजही होतीच .....
मला कळतच नाहीये प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला हक्काचा हीरो, माझ्या आयुष्यात साइडरोल का करून गेला...! 
असो ! 
म्हणूनच डोळ्यातला अभिमानाचा समुद्र तिच्या पायाशी ठेऊन म्हणते, " बापाचं जाऊदे ,पण आई भरभरून दिली, इतकी की बाप होऊनही ती पुरून उरली ........"
"हॅपी फादर्सडे आई ...."
तुझीच लाडली. 
(वेगळ्या दृष्टीकोनातून पाहायला मिळालेले वडील)



बापआई तू...

by on जून १७, २०१८
"वडील (?) कोण आहे हा व्यक्ती ? शब्द नवा नाहीये पण माझ्यासाठी कोण आहे ... ? त्याची माझ्या आयुष्यातली भूमिका काय आहे..?"...