Sufi: स्वर्गानुभूती
स्वर्गानुभूती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्वर्गानुभूती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

'तिचं' माझ्याशी बोलणं झालं आज.
ती आमची तिसरी ओळख होती. पहिली ओळख तिच्या कामातून मला झाली होती. दुसरी ओळख मी तिच्याही नकळत सोशल साइट्सवर तिला शोधून केली होती. माणूस एखाद्याकडे खेचला गेला की त्याची संपूर्ण छाननी करूनच बाहेर पडतो. मीही सुरुवातीला तिला वरवर ओळखलं होतं. पण मध्ये खूप काळ लोटला होता. मी विसरूनही गेले होते.
पण आज अचानक दिवसाच्या ओघात ती मला दिसली.
रवीने तिच्याबरोबर असलेला एक सुंदर फोटो आणि तिच्या कर्तुत्वाची कहाणी टाकली होती. रवी आमचा म्युच्युअल फ्रेंड होता.
मला ती आठवली. ती सर्वसाधारण नव्हती पण खुपही प्रसिद्ध नव्हती.
पण ती  माझ्यासाठी प्रसिद्ध होती.
तिची दृष्टी माझ्यापर्यंत पोहोचली होती, ती माझ्या मनात तितकी प्रसिद्ध झाली होती.
मी स्वत:च्या विश्वात तिला रुमझुम‌ म्हणू लागले होते.
रुमझुम दिसायला इतरांसारखीच होती. तसे सगळेच एकमेकांसारखे असतात. पण झूम केलं की मग खरं वेगळंपण दिसू लागतं.
शरीरयष्टी जाड, नाक बसक, भुवयांना विरळ केसांचे सौंदर्य होते, केसांची कुरुळी एक बट त्या गरगरीत मुखड्यावर ओघळत आलेली. पण तिची त्वचा वेगळी होती, चमचमीत होती. मी त्या फोटोला न्याहाळत होते, एक सेकंदपरतून मी पुन्हा त्या चमचमीत त्वचेला पाहू लागले. एक सुरकुती नाही ना कुठलाच फुटकळ स्कार... एक आयुष्य इतकं साफसूथरं? कदाचित ते वरतून दिसणारं असावं.?
पण म्हणजे एखाद्या गोल गरगरीत कोऱ्या कागदावर, उशीर आहे डोळे, कान, नाक आणि त्या भुवया ठेवण्याचा.? 
माझ्या मनात तिचं व्यक्तिमत्व आधीच उच्च स्थानावर होतं, आता तिच्या बाह्यांगाला मी पाहत होते. तिचा साचा मला पहायचा होता. म्हणजे मी जजमेंटल न बनता तिला बघणार होते, जणू एक संपूर्ण यशस्वी अन् वेगळं व्यक्तिमत्व कसं असू शकतं याच कुतूहल मनात होतं, मी तिला पहात गेले. 
ती एक कॅमेराबरोबर खेळणारी अन् त्यातून जादू निर्माण करणारी निर्माती होती. तिला तिच्या आयुष्याच्या मर्यादा नव्हत्या. कुठल्याच नाही! 
हे माझ्या जमण्याच्या बाहेर होतं कारण मी माझ्यातून एखादा उडण्याचा, नि चौकटी बाहेरचा निर्णय घेऊन बाहेर पडणारच असते, पण बाहेर लगेच माझे घरचे उभे असतात. त्यामुळे कुठल्यातरी आचारसंहितेने आखलेल्या आयुष्यात , कलेच्या आझादीला मर्यादा येतात. त्यामुळे बहुतेकदा माझी कला घुस्मटत, गटांगळ्या खात असते.  
तिला मोकळं उडायचं असतं ते हवं तेव्हा. ! त्यावेळी माणसांच्या आयुष्यातल्या सामाजिक बंधनाचा तिला राग असतो. माझंही तेच होऊ लागलं होतं. 
पण मी रुमझुमला बघायचे. ती मुक्तछंदी होती. स्वतःच्या स्वप्नांना अलगद जपणारी. तिच्या स्वप्नांना स्वतः आधी आदर देणारी!
अशावेळी ते असतं ना, आपलं स्वप्न दुसरं कुणी जगत असलं की आपण त्याला दृष्ट लावत नाही, त्याच्या स्वप्नात आपलं स्वप्न पूर्ण व्हायची ओढ बघत असतो. मी यातच वाढत होते. 
      हळूहळू रुमझुम आणि माझं वरवरचं बोलणं होऊ लागलं होतं. 
रुमझुमला माझी कला, माझं व्यक्त होणं आवडत होतं. ती मला कौतुकाची थाप देत असे. मी भारावून जात असे. तिच्या आयुष्याशी माझा संबंध होता की नव्हता मला आजही माहीत नव्हतं. पण ती बोलली की मला छान वाटायचं. हुरूप यायचा काहीतरी लार्जर दॅन लाईफ करण्याची प्रेरणा यायची. तिचा आधार वाटू लागला होता. एका मित्राचा वाटतो तसाच तिचा आधार !
याच काळात, काल माझा दिवस एका मित्राच्या विश्वासघातामुळे वाईट गेला, त्यामुळे एकांतात खुप चिडचिड करून शेवटी एक दुखी स्टेटस टाकून मी झोपी गेले. 
सकाळी पाहते तर रुमझुमचा मेसेज.... :O आणि तोही असा कोणता फॉर्मल मेसेज नव्हता. 
मी ना आधी डोळे चोळत चोळत लगेच त्या मेसेजला टॅप करून वाचू लागले. 
"हे नाजनी ( ब्युटिफुल), काय झालं ?
एवढं नाही मनावर घ्यायचं, आयुष्य आहे क्षण उडून जायलाच असतात... क्षण उडतात, दुःख का कवटाळून ठेवायचं?
आता उगाच फॉर्मलिटीमध्ये अडकणार नाही. दुःख करून घे एक दिवस दोन दिवस यापलिकडे नाही. त्याला अर्थ नसतो कारण अशी माणसे येत राहतात, जात राहतात. आयुष्याला वाऱ्यासारख मोकळं सोड.!"
     मला म्ह्णजे काय बोलावं, काय लिहावं, काय मांडावं सुचेना. जे जे लिहीत होते कीबोर्ड हातातून सुटत होता. पण मला शब्द आणि रचना आणि तिच्यासाठीचां पहिला मेसेज खास लिहायचा होता. कसलीच माझ्या व्याकरणानुसार चूक नसलेला संदेश,
"उम्मम... सॉरी रुमझुमा,
हे सॉरी माझ्या आयुष्यातल्या त्या व्यक्तीसाठी ज्यामुळे माझा वेळ वाया गेला. पण त्याच व्यक्तीला शुक्रियाही म्हणेल ज्यामुळे आज तुझा संदेश या इनबॉक्सपर्यंत स्वतःहून आला. तोही साधा संदेश नाहीच, तुझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा 
आणि काही व्यक्ती असतात ना शिंपल्यांसारखे. अपेक्षेने आपले केलेले शिंपले, सुटत नाही सहज. 
पण आता लाटा बनून समुद्रात ढकलून देईल हा शिंपल्यांचा कडवटपणा. तू म्हणतेय नं, खरंय वारा आहे हे आयुष्य! 
तूच ...! "
आमच्या दोघींच्या आयुष्यातला हा एकमेकींना पाठवलेला साजेसा सुंदर सुबकतेने पाठवलेला पहिला मेसेज... त्यानंतर आम्ही सुरू जे झालो... ते कधी इतक्या शाब्दिक अन् स्वच्छ भाषेत बोललोच नाही. 
अनोळखीतून मैत्री झाली,
मैत्रीतून चेहरा बघणारी भेट झाली. भेटीत दोन नवे विचार, नवे चेहरे आणि नवे आयुष्य अन् त्या आयुष्यातली कथा भेटल्याचा आनंद होता. 

भावना व्यक्त करून, खाऊन, पिऊन घरी गेल्यानंतर मेसेजिंग वाढलं, घट्ट झाले धागे. सगळं असं कोणत्यातरी नव्या जगातलं वाटू लागलं. दोघींना लाल रंग आवडायचा नाही, काळाच्या प्रेमात पडलो. पाणीपुरी नाही, दालचा आम्ही वेड्यासारखा खाल्ला. झेड ब्रिजवर नाही रिकाम्या रस्त्यांवर मध्यरात्री  बेफिकीरीने फिरलो. तिच्या कमरेला माझ्या हाताच्या वळणाने आपलंस करण्यात मला तिचा रस्ता होण्याचं सुख मिळू लागलं. दोघींच्या भावना, प्रतिसाद, हसणं बदलू लागलं. हसणं आता लाजणं होऊ लागलं होतं, चिडणं आता मनवण्यासोबतच आलं होतं.
मैत्री की मितवा यात अडकत कसं गेलो कळलच नाही आम्हाला.
पण मुलगी मुलगी? प्रेम? 
श्या.! 
ए काहीही! हे असं नसणारे. हो नं ? 
आम्ही दोघी एकमेकींना समजावत राहिलो. चार दिवस नीट बोलून त्यातला एखादा दिवस अचानक ती बोलणं बंद करायची, आणि तसच अचानक एखादा दिवस मी बोलणं बंद करू लागले. 
'सवयींचे आजोळ महागात पडणार' म्हणून आम्ही हे अंतर एकमेकींत आणत होतो. पण तरीही एकदा प्रेमाचं स्फुलिंग चेतलं की, त्यातून मग काहीच दाबलं जात नाही. त्यातून केवळ ते प्रेम उफाळुन येणं असतं. त्यामुळे हे निष्फळ प्रयत्न एकमेकींना समजत होते. तरीही एकीचीही हिंमत होत नव्हती. माझा ता दूरवर विषयच नव्हता.
मी पुढाकार घेणार नव्हतेच कारण हे 'आयुष्य' माझ्या वाट्याला आलं होतं, ते कुठल्याही वळणावर मला 'पोरकं' करेल या भीतीने मी त्याबाबत बोलणं टाळू लागले...
आता हा संवाद मला बंद करणं भाग होतं कारण जर तसं केलं नसतं आणि तिच्या मनात तसं काहीच नसतं तर मी आयुष्यभर तिच्या प्रेमात तशीच विचार करत, आलेल्या नव्या आयुष्याला झुरत ठेवलं असतं.
त्यामुळे तिच्या मनातलं जाणून घेण्यासाठी मी तिच्याशी बोलणं बंद केलं.
तिला सुरुवातीला समजलं नाही. ती रोजच्या दिवसांसारखे दिवस ढकलू लागली.
कारण याआधी आम्ही असं चार दिवसातून एकदा न बोलण्याचे खेळ खेळायचो. म्हणून सुरुवातीचे चार दिवस तिने नेहमीसारखे प्रयत्न केले. पण यावेळी चार दिवसांच्या वर जाऊनही मी तिला मेसेज, कॉल केले नाही. आता मात्र मला आतून एका मनाला वाटायचं, तिचा कॉल येईल, ती मला जाब विचारेलच.
नाहीतर किमान मेसेज तरी? मी स्वतःच्या मनाला समजुतीने वेड्यात काढत बसायचे, जर आता मम्मी मला ओरडली नाही तर तिचा कॉल येणार नाही, पण जर मम्मी ओरडली तर कॉल येईल आणि हे असे आणि अनेक प्रकार करून पाहायचे. पण माझे प्रयत्न फसत होते.
पाचवा दिवस फेल गेला.
तिचा कॉल मेसेज आलाच नाही. 
तुला काय वाटतं? 
काय करेल ती? 
तिचं प्रेम आहे?
जर आज पेपर टाकताना पेपरवाल्याचा चेहरा दिसला तर तिचं प्रेम आहे. पण नाही दिसला तर? 
ते जाऊदे पण तिचा कॉल येईल. 
येईल ना?... 
मी अशी एका प्रेमाच्या समुद्रात दोन दगडावर पाय देऊन उभी असल्यासारखी भासत होते, एका दगडावर प्रेम आहे एकावर नाही.
माझा तोल जात होता, पण मोबाईल हातातून सुटत नव्हता. कारण तो क्षण मला वार्यावर उडू द्यायचा नव्हता, जिथे तिची माझ्या आयुष्यात येण्याची चाहूल असेल, एक पहिला हक्काचा श्वास असेल माझ्यात येण्याचा तिचा. तो मी असाच सोडणार नव्हते. 
सातवा दिवस असाच प्रतीक्षेत गेला. 
आता दिवसाबरोबर आशा पण मावळत चालली होती. मनातल्या मनात सारखं, 'संपलं स्सगळ!' म्हणत मी आशा सोडत होते. तरीही आमचं नातं माझ्या उमेदीचा हात धरून मला धीर देत होती. 
आता हळूहळू दिवस ढकलायला मी माझे मन कामात गुंतून ठेऊ लागले. तरीही माझ्या चित्रकलेत तिच्या अन् माझ्या अस्तित्वाच्या अप्रत्यक्ष खुणा दिसू लागल्या होत्या. चित्र 'कपल'चे असेल त्यात मला आम्ही दोघी दिसू लागलो होतो, चित्र ऍबस्ट्रॅक्ट असेल तर त्यातही मला कुठल्याही आकाराने ब्रश फिरताना तुटलेल्या अवस्थेत मी, नाहीतर जोडलेल्या हातांनी आमचे दोघींचे एकमेकींच्या आयुष्यात गुंफलेले हात दिसायचे. 
मनाचे हेच खेळ सतत चालू होते. दिवस जात नव्हता, रात्रीला आमच्या आठवणी पुरायच्या.
शेवटी आज मी ब्रश हातात धरला. खूप धीराने स्वतःला सामोरं जायचं ठरवलं, तिला विसरून आज ग्राहकाला हवं तसं पेंटिंग देऊ, व्यावसायिक पेंटिंग, त्यात प्रेमाचा अंश नसेल असं पेंटिंग. शक्य होतं? ... मी इतक्या मोठ्या विचारांच्या अडचणीत होते, तोच टिडींग... फोनचा मेसेज बॉक्स वाजला. 
"भेटूया! ... उडणाऱ्या वाऱ्यात काही पाखरं एकच झाडावर येऊन बसतात, त्यातलं एक पाखरु ते झाड सोडत नाही.सुटत नाहीच ते झाड त्याच्याकडून. 
आपल्या ठिकाणी ये.! जमल्यास माफ कर. " 

माझा चेहरा, माझा हातातला ब्रश त्या चित्रावर कोरडा राहिलेला, तो मेसेज एका हातात ब्रश ठेऊन वाचला. मेसेजचां पूर्णविराम वाचतानाच तो ब्रश नकळत त्या काळ्या रंगाच्या डब्यात जाऊन त्याचं टोक एबस्ट्रॅक टाकत त्या छटेला त्या कोऱ्या कागदावर मोकळं करताना पाहताना जो प्रेमाचा रंग नी श्वास त्या कागदावर उमटला त्याने उमेदीची परमोच्च पातळी गाठली.
शेवटी दोघींनी भेटायचं ठरवलं.
ती भेट प्रतिक्षेच्या क्षणाची शेवटची आशा होती. 
मी खूप स्वत:ला मानसिकरीत्या जागेवर ठेवून जात होते.
तिचा नावडता ड्रेस आणि रंग मी घातला. केसांना कुठलेच वळण ना चेहऱ्याला लिपस्टिकचा रंग ओढला. मनात ओघळत असलेले एका ब्रशाचे आनंद, सुख, उकळ्या, प्रेम हे ओघळ होते, पण दुसऱ्या धारेत लगेच तो ओशाळलेला, नाराज अन् तुटलेपणाचा राखाडी रंग होता. त्या कागदाला तो रंग नको होता. 
आम्ही भेटलो, ती खूप सुंदर, नाही सुंदर नाही ती त्या क्षणी माझ्या आयुष्यातल्या दुष्काळातील, 'निसर्ग' होती. तिने येणं हेच माझ्यासाठी सुख होतं यापुढे तिने शब्दही न बोलावा. तिचे अस्तित्वच मला उमेद द्यायला पुरेस असायचे. 
"सोडून गेली तर आशा कुठून शोधावी? " मनातल्या मनात स्फुटत असलेलं वाक्य ओठांनी अचानक बाहेर 
ढकलल.
"हाहाहा sssss...." 
ती हसली. 
ती हसली की माझं टेंशन जायचं वगैरे मान्य होतं. पण ती वेळ माझ्या महत्त्वाच्या वळणाची होती. मला कुठलेच भाव तिथे नको होते. तिने आल्या क्षणी तिचे मन, तिची भावना, मला कुठल्याच एक्स्प्रेशन फॉर्मलिटी शिवाय सांगावे अशी माझी इच्छा होती. पण तिचं मन काय विचार करते, ते समजणं गरजेचं होतं. 
'का हसलीस?' मी शांत होत विचारलं. 
ती - तू वेडी आहेस. 
मी - बरं
मग? 
ती - कशी आहे ग? आधी मी आले की सुरुवात काहीतरी सुंदर्षा कॉम्प्लिमेंटने करायचीस, आज विसरली? 
तुझं मुलांसारखेच असणारे, तसच होणारे. 
मी - जाऊदे ना एवढ्या दूरचा तुला काय फरक पडतो.? 
ती - फरक ? होना कसा पडेल ? काय पण ना... मैत्रीत कसा बर फरक पडेल.? 
मी - म्हणजे मैत्री आहे...? आपल्यात.? 
मी शंकेच्या प्रश्नचिन्हाने तिचं मत जाणून घ्यायचा चुकीचा प्रयत्न करत होते. पण ती शातिर होती. कुठलीच जागा माझ्या गोलात देत नव्हती. 
"काय ते सांगून मोकळी हो. 
फक्त एवढं सांग हो की नाही.?
हो असेल तर, तेवढी हिंमत कर आणि सगळ्यांसमोर एक लॉंssssन्ग किस कर आणि नसेल तस काहीतर इथून तत्काळ उठून जा."
हे बोलून माझं मन मोठ्या शंकेच्या डोहात बुडाले.‌ 
मी मोठ्ठा श्वास घेतला, मनाची तयारी केलीच.
प्रेम माणसाला सगळ्या भावनांचा आदर करायला शिकवते. 
तोच ती उठली.
माझा एक श्वास माझ्या पोटात गोळा आला. भूवयांवर टेंशनचं सावट. डोळे झाकूनच गेले घट्ट... 
तिच्या वावरण्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न माझं नाक करत होतं, अंधारात चाचपडावं तसं स्वतःच्या प्रश्नात उत्तर शोधण्याचा किती टोकाचा प्रयत्न मी करत असले माझं मलाच माहीत होतं. स्वतःची एवढी परीक्षा मी कधी पाहिली नव्हती,
आणि चाचपडतानाच अचानक तिच्या ब्रेसलेटचा धागा माझ्या मानेला लागला, डोळे उघडणारच पण ती चूक होणार होती म्हणून मी आतल्या आतच सगळ्या श्वासांचे प्रेमात मिश्रण करून उमेदीची खिडकी उघडली, नि क्काय? तिने दोन्ही हातांनी मानेला घट्ट पकडून माझ्या ओठांवर ओठ घट्टपणे ठेऊन टांगत्या श्वासांना मुक्त केलं.

पोटातला गोळा मुक्त झाला होता, श्वासांत आझादी आली होती
नि वार्याबरोबर उडणार्या पाखरांसारखे काही पाखरं असतात, शिकवलं तिनेच... 
निशब्द यापुढे आम्ही दोघीही त्या किसमध्ये अतोनात प्रेमाची उसंत टाकून तो सर्वांगात अनुभवून खुउउउउउप शांत झालो...



माझ्या विळख्यातली 'ती'

by on मे १६, २०१९
'तिचं' माझ्याशी बोलणं झालं आज. ती आमची तिसरी ओळख होती. पहिली ओळख तिच्या कामातून मला झाली होती. दुसरी ओळख मी तिच्याही नकळत...

आज खूप दिवसांनी त्याची आठवण झाली ...प्रेम बीम नसावच ते, पण मला तो आवडायचा... त्याच्या मित्रांमुळे मला तो आवडायला लागला. मी बघितलं आणि त्याच्या मित्रांनी मला बघितलं. इथेच माझे कॉलेजचे दिवस सुरू झाले. मग मला कुछ कुछ होता है पण आवडला, नि राजा हिंदुस्थानीही आवडला.
कॉलेजमध्ये आपली पण एखादी लव्हस्टोरी असावी म्हणून ते प्रेम होत बहुदा... ! घरचे म्हणता म्हणून लग्नासाठी पोरगा बघावा तसं त्याचे मित्र आम्हाला चिडवता म्हणून आमची पण लव्हस्टोरी असावी. एवढा साधा आयुष्याचा मोटो होता. म्हणून एकच ध्येय, की त्याच्याबरोबर निदान पुढच्या इयत्तेत जाण्याएवढा अभ्यास करावा. मग त्यात कोणत्याही सरांची बोलणी खावी, अगदी गोड वाटायचं सगळं...
         खरं सांगायचं तर, त्यावेळी ना फेमची भूक, ना रीचनेसची बाडबिस्तर, नाही शाइनिंगची दुकान ... त्याने फक्त आहे तसं स्वीकाराव नि त्याच्या मित्रांनी असच जोडीनं चिडवत राहावं इतकंच काय ते वाटायचे. एकवेळेला स्वीकारलं नाही तरी चालेल, पण एकवार त्याने ते गोंडस हसून पहाव इतकंच. वेड होतं ते पुरतं. आजच्या रिचनेसमध्ये मी त्याच्या रिचस्माइलवर मरत होते. आजही ते सगळं आठवून स्वतःला निरागस बावळट म्हणण्याचा चान्स मी सोडत नाही.
          हॅहॅहॅ.... तो गॅदरिंगचा दिवस कसा विसरू!  ....कधी नाही ते साडी घालायचं मनावर घेतल. का ते सांगू नाही शकत. इश्श लाज वगैरे वाटते जरा. अशातच तो भरमसाठ झगा गावभर घेऊन कॉलेजपर्यंत जायचं, 'वैसे उसके लिए ना सही, लेकिन उसके एक झलक के लिये इतना तो बनता था यार' ...मी छान तयार होऊन गेले. मी सांगते, वायफळ तयार होणं होत ते.... टोटल वायफळ ! आयुष्यातला व्यर्थ दिवस.
          आमच्या एकतर्फ्या प्रेमाची चर्चा गावभर नसली तरी ग्रूपभर होती. त्यामुळे त्यांना आयता बकरा मिळाला होता....त्यांच्या चिडवण्याचा मला काडीमात्र फरक पडत नव्हता. फक्त तो का दिसत नाही?, एवढ एकच एक मनात घोळत होतं. कॉलेजमध्ये घुसल्यापासून डोळ्यात फक्त त्याची झलक होती. पण तो दिसायला तयार नव्हता. तसं कॉलेजच्या दिवसांत 'आपणही सुंदर दिसु शकतो हे ध्यानीमनीही नव्हतं'. त्याच काळात ती गारव्या हिरव्या रंगाची साडी, ओठांना लाल रंग, चेहऱ्याच्या कातडीला फाउंडेशन वगैरेचा झोलच नव्हता, आपली पौंड्स पावडरच ते तेज जे खुलवायची ते लाजवाब असायचं आपल्या नैसर्गिक त्वचेला कसला धक्का लागायचा नाही. नि ब्लश ? ब्लश हे गालांना लावलं जातं हे आत्ता कळण्याचे दिवस. त्या काळात हा ब्लश आनंदाने सजवायचा तो फक्त आपल्या प्रिय व्यक्तीच्या हातून. विकत न मिळणारा हा ब्लश भलता मौल्यवान वाटायचा.
हाच ब्लश चेहऱ्यावर येत नव्हता कारण तो अजूनही कॉलेजमध्ये आला नव्हता. की मग आला होता पण मला दिसत नव्हता ? माझी हुरहूर संताप वाढत होता.  शेवटी बळीचा बकरा बनले मी ! माझं गृपमध्ये लक्ष नाही हे बघून मित्रांनी  मला तो येईपर्यंत 'अलका याग्निकच्या आवाजातल घूंगट की आड से' कंटिन्यू एकामागे एक प्रोपोगंडा राबवावा तसं ऐकायला लावलं .... न ऐकण्याच्या आविर्भावात असलेली मी मित्रांनी त्याची शपथ दिल्यावर विरघळले होते.  आणि त्या रणरणत्या तापत्या उन्हात मी एका परफेक्ट सोलमेटसारखं ते गाणं कानातून रक्त येईपर्यंत ऐकत होते, ऐकत होते, ऐकतच होते! पण मी गाण्याचा एक शब्दही ऐकला नव्हता कारण माझी नजर, कान, डोळे हे फक्त आतुर होते त्याच्यासाठी.  तरी तो दिसला नाही.  ते सहा मिनटाचं गाणं तो दिसेपर्यंत कमीतकमी सहा-सात वेळा मी ऐकलं असेल, तेव्हा कळलं किती दुख त्या चित्रपटातल्या नटीला झालं असेल जेव्हा तिच्य शृंगारानंतर तिच्या प्रियकराने तिला पाहिलं नसेल ...पण मी मुलगी असुन मी लवकर आवरून आले याला का इतका वेळ लागतोय?. माझी स्वतःवर आणि त्या झग्यावर प्रचंड चीडचिड होत होती. आणि गेस व्हॉट फायनली तो दिसला नि यांनी 'जब तक ना पडे आशिक़ की नजर' म्हणून इशारा केला.. आणि चक्क या कॉलेजच्या एका वर्षाच्या नजरानजरमध्ये पहिल्यांदा तो हसला, मला विश्वास बसेना तो हसला होता. आयेहाय....! ते हसणं, त्याचे ते ओठ जे मला बघून हसले होते, आणि ते डोळे मला बघून दुजोरा देत होते की 'तु हे माझ्यासाठी केलं आहेस आणि मला ते कतल-ए- नजर' आवडलं आहे....  वूओवssssss माझा आनंदच कमी होत नव्हता.  काय गुदगुल्या होत होत्या म्हणून सांगू, गालावरचा तो ब्लश तर ओसंडून वाहत होता. बिकाउ ब्लश असता तर या ब्लशपुढे उडून गेला असता. हा मौल्यवान होता! 
          गोष्ट एवढ्यावरच थांबली नव्हती, तो हसलाही आणि थोड्यावेळाने मित्रांबरोबर त्याने पुढे जाऊन पुन्हा एकवार वळून मागे बघितले होते त्याने . मला त्याला ओरडावंस वाटत होतं की ' वेडाये का तू ? ऐसे देखकरही मार डालोगे तुम'.अहाहाsss अलका याग्निक मानवली होती. माझं सर्वांग त्याच्या त्या 'फिरसे मुडकर देखना तुम्हारा रास आ रहा हैं हमें, युं ऐसेही देखा करो ना हमें' म्हणत त्याचं स्वागत करत होती. .... मी खूsssssप खूप खुश होते.
           माझं साडीप्रकरण गाजलं होतं.  ते आजही मन शाहळून जातं ... त्याचा तेवढाच एक फोटो मेमरीमध्ये कॅप्चर झाला जो आजही कुठली अलमारी उघडून बघावा नाही लागत. आठवण आली की समोर माझ्या तो फोटो येउन ठाकतो.
 त्यानंतर बारावी झाली, कॉलेज संपलं, ती निरागसता ते प्रेम नावाचं व्यसनही सुटलं. या मोठ्या गोष्टींच्या गर्तेत ते ऊनही विसरले नि अलका याग्निकलासुद्धा. आठवणीत होतं फक्त त्याचं गोंडस हसणं  ..बस्स ती पहिली नि शेवटची स्टेप स्वतःच्या प्रेमासाठी आणि प्रेमाच्या तसल्लीसाठी. !
अशावेळी वर्तमानात डोकावून पाहिलं की वाटतं, कुठलं प्रेम करतात आजकालची ही सात-आठवीची मुलं ...?
          मला आठवतंय, ना त्याचा हात हातात घेतला ना हिमतीनं त्याच्या डोळ्यात कधी पाहिलं. उलट त्याला पाहून ब्लश करणं नि लाजणं हाच प्रेमातला नाजूकपणा होता, जीवंतपणा होता!
          ऊप्स ती केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स लॅब.. ते  विसरले तर कॉलेज आणि तो पूर्ण होईलच कसा  ? याची तर मज्जाच वेगळी असायची. त्याने मला वर नजर करुन पहावं म्हणून निमित्त करत आम्ही रोज उशीरा पोहोचायचो नि कितीतरी वेळ सरांची तीच ती बोलनीही खायचो. सर तिकडे बोलत बसायचे मी इकडे डोळ्यांचे चोचले पुरवायचे... कित्ती गोड चिडायचे ते सर .... आणि तेवढं करुनही सरांच मन भरायचं नाही ते आमच्या बॅच वेगवेगळ्या करायला जायचे. ये जुदाई मै भला होणे देती. मी बंड करून उठायचे नि म्हणायचे ' त्या लॅबमध्ये बर्नर, माचीसपेटी नाहीये सर, मॅडमने इकडेच पाठवलंय' आणि एवढ्या धाडसाने त्याच्याच बॅचमधे प्रॅक्टिकलला बसायचे. प्यार धाडस देता हैं कुछ भी करने का ... आणि हेच धाडस करत नजर मैत्रीणीशी भिडवत त्याच्याकडे हात करत बर्नरसाठी माचीस त्याच्याकडेच मागायची. नजरेला गुस्ताखी करण्याची संधीच द्यायची नाही. त्यामुळे सगळं बोलायचो पण बोलायचोच नाही.  अजब असायचं सगळं काही ....
             हाहाहा तो मराठीचा पेपर .... आज आठवतानासुद्धा कस ताजं वाटतय सगळं, जसं आत्ताच घडलं असावं नि मी चित्रपटात पाहत असावी.  त्याच्याकडे पेपर लिहायला परीक्षा पेपर नव्हता. मित्रांकडे मागितल्यानंतर मलाही मागितली. त्याने पहिल्यांदा काहितरी मागवलं आणि मी त्याला नकार द्यावा हे मला पटत नव्हतं म्हणून मी ' आहे  ना... पण बाथरुमला जाऊन येते मग देते.' म्हणून जी त्या कॉलेज स्टेशनरीत धूम ठोकली ती  माझ्याकडे नाही म्हणून परीक्षा सुरु व्हायचा शेवटच्या मिनिटापर्यंत बाहेर थांबून ती घेतलीच नि ती घेऊनच वरती आले. पण्ण माझं दुर्दैव हे की त्याआधीच त्याला परिक्षा पेपर मिळाल होता पण सुदैव हेच की परिक्षा निरिक्षकाने  पेपरला बसू दिलं. डर नापास व्हायचं नव्हतं रे कधी... दुसऱ्या वर्गात जाऊन बघायला कष्ट लागले असते ना जरा आणि स्वतःच्या वर्गातून त्याला बघण्याची मजाच काही और असायची. म्हणून ही उठाठेव !
          काय एक एक खूळ असायचं त्यावेळी मैत्रीणींच्या सांगण्यावरून नवीन ड्रेस घातला, नवीन हेअरस्टाईल केली की वाटायचं आधी त्याने बघावं एवढी साधी इच्छा आणि आणि आनंद असायचा तेव्हा. नाहीच कधी बघितलं तर थोडस हार्टफेल व्हायचंच यार्र प्यार नहीं था लेकीन एकतर्फा तो था त्यामुळे....'प्रेमात खचून नाय जायच बॉस ' हा मंत्रा कॉलेजभर पुरला ... पुढल्या दिवशी पुन्हा नवीन प्रयोग नवीन प्रयत्न, ना अहंकार ना ऍटिट्यूड ... सगळ कसं एकदम निर्मळ नि हार्मलेस होतं...
           सगळ झालं. आज तीन वर्षे झाली. सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्या असण्यापासून त्याची अटेंडेन्स लावण्यापर्यंत सगळंपण त्याला ना कधी कळलं, ना मला सांगावस वाटल ....
त्ते म्हणतात ना प्रश्न,भांडण,वाद आणि ब्रेकअप या गोष्टी प्रेम व्यक्त केल्यावर सुरू होतात म्हणून मी कधी बोललेच नाही.
 कारण त्याच्याबरोबर ब्रेकअपच दुख: नव्हत मला, फक्त माझ्या प्रेमाबरोबर मला ब्रेकअप नव्हतं करायच खरंच! जसं होतं तसं मस्त होतं, माझं होतं. यात मी खूश होते प्रचंड! ना अपेक्षा ना भीती. जो जवळच नाही, तो दूर जाण्याची भीती नसते आणि जो हृदयात आहे कित्येक वर्षापासून एकतर्फी प्रेमात, त्याने आपल्याला सोडावं हा लवलेश नसतो ....
"उसने कभी उस नजर से मुझे देखा नही बात अलग है,
लेकिन मे उसे उसी एकतर्फी-नजर से देखुंगी ये भी तेय है ||" या वाक्यातलं समाधान मला जपायचं होतं.
एकच समाधान असेल आयुष्यभर की, हे माझं हक्काच प्रेम ना लग्नानंतर मला आडवं येईल ना आत्ता ....
            फक्त ते दिवस असमंजस, खुळे निरागस आणि खऱ्या प्रेमाचे होते. ते परिकथेचे दिवस गेल्याचं थोडं दुख या समंजस आयुष्याचा ताण आला की मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आहे.  अन पहिला दिवस आठवल्यावर त्याचा चंपू तेल लावलेला चेहरा नि सेंड-ऑफच्या दिवशी स्पाईक्स केलेला चेहरा , दोन्ही बिफोर-आफ्टरसारखे आठवतील नि या बिफोर आफ्टरमधला एक अख्खा आठवणींचा जलाशय, त्याच्या हास्याने नि फक्त त्याच्या अस्तित्वाने तुडुंब भरलेला दिसेल ...

#shades of Love


ये उन दिनों की मोहब्बत हैं|

by on जुलै २४, २०१८
आज खूप दिवसांनी त्याची आठवण झाली ... प्रेम बीम नसावच ते, पण मला तो आवडायचा...  त्याच्या मित्रांमुळे मला तो आवडायला लागला. मी बघितलं आणि...
कुटंबातल्या नात्यांत...
धागे गुंततात, उलगडायला वेळ लागतो.
एकत्र जोडुन धरायला वेळ लागतो की, मग उलगडणं महत्वाचं वाटत नाही ?
असमान आसमंत अटळ होत जातो. निर्मितीकक्षा चिवट होतात आणि 'पुन्हा सगळ्यांनी एकत्र यावं' हा आविर्भावही कुणाच्या मनावर बिंबत नाही ...माणुस समुद्र नाही होऊ शकत, तो तितका विशाल नाही बनू शकत. त्याच्यात कुणाला आपलंस करण्याच सामर्थ्य नसतं...तो निस्वार्थ होणं म्हणजे ... असो ! 
सुरेश आज खूप दिवसांनी घरी आला. मी खुश होते. अम्मू पण खुश झाली. जाईच्या चेहर्यावर मात्र कडवट भेग विस्फारली. मन्याला काही कळणं तर अशक्य होतं. शेवटी प्रश्न होता सुरेशचा ...
नात्यांतल्या गैरसमजाचा, वादाचा हा खेळ खुऊप कडवट असतो. समजण्या आणि समजावण्यापलीकडचा ...
सुरेश आयुष्य जगला होता. 'रुबाबतील ढब' एक व्यक्तिमत्व होतं त्याचं. समोरचा बेधडक गार होऊन त्याचं ऐकायचा, असा तो होता. घरातल्या किंवा बाहेरच्या कुठल्याच नात्याला मानायचा न जपायचा तो. त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे सुस्पष्ट ढोंगीपणा होता. जेही होतं जगासाठी, जगाच्या दृष्टीने.. 
दूर कशाला जायचं, कालचंच उदाहरण सांगते.
शलाखाने (मैत्रीण) फेसबुकला स्टेटस टाकलं होतं,
"रिश्तोंसे खूबसूरत कोई दौलत नहीं होती, दौलत होकें भी रिश्ते ना हो तो आपकी खुशिया भी दुबली हो जाती है | "
त्यावर त्याने कॉमेंट केली:
"बहोत खूब शलाखा... आजकाल की जनरेशन कहाँ ईतना सोचती है ...."
सुरेश इथेच सिद्ध झाला.! 

पण.............
हो 'पण' आहेच.
स्वभावबद्ध प्रतिमा कधीकधी बदलतात. इतक्या की सुखद अपेक्षाभंग होतो आणि आवाक भाव जखडून मन जोखिमीने प्रश्न करून उठतात.
सुरेशने आज 'मला' घरी आणलं होतं. यावेळी घरी येताना त्याने स्वतःच्या पलिकडे बघण्याचे कष्ट घेतले होते. 
मन्याला बोटांनी अक्षरओळखीची पाटी आणि अम्मूसाठी साडी आणली होती .... सुरेशचं हे बदलणं अनपेक्षित होतं.! 
यासगळ्यात जाई मात्र कडाडून तापलेली होती. तिच्या रेखीव डोळ्यांत तो अंगार झळकला. अम्मूने हातानेच शांत केलं तिला. प्रेमळ सासू असली तरी सुरेशची ती आई होती. त्यामुळे स्वाभाविक तिचा कल सुरेशकडे जास्त होता.
भेगाळलेला राग तिचा एखाद्या नसेतून बाहेर येणार होताच, तोच रेडिओ 'सदाबहार'ला अलका याग्निकचं 'क्या तुम्हे याद हैं।' लागलं...
आणि...
आणि चक्क सुरेशने जाईचा हात हातात घेतला. तिला एका जेंटलमनसारखं 'वूड यू लाईक टू डॅन्स विद मि ?' विचारलं. अडखळत, गोंधळत जाईची पुरती धांदल होत, विचारांची फरफट होत ... हो? नाही? च्या वावरातच ती नकळत त्याच्याबरोबर संलग्न झाली होती.
घरात आम्ही सगळे होतो, अगदी आधीचेच सगळे ... पण त्याने घेतलेल्या या अनपेक्षित स्वभाव वळणाने आम्हीही चाटच पडलो...
घरात ही अशी कित्येक दिवसानंतर क्षणाक्षणावर, घरातल्या भिंतीभिंतींवर ख़ुशी बहरत होती. भेगाळलेल्या भिंतींत ती बसली होती. 
आता पुढे कित्येक वर्षे या दृष्ट लागल्या घरी पुन्हा कुणी रुसणार नव्हतं, रागावणार नव्हतं, अबोला धरणार नव्हतं....  
जाई खुश होती. कारण जाईसाठी भेट म्हणून खुद्द सुरेशच आला होता. तिला आता काहीच नको होत ... अम्मूची तर काळजी तेव्हाच मिटली,जेव्हा सुरेशने आईसाठी साडी घ्यावी, या विचाराने साडी आणली. अक्षरओळखीची पाटी आणून न सांगता त्याने मन्याची जबाबदारीही घेतली. 
आणि मी ?
माझं काय ?
मी तीच होते जी त्या रात्री सुरेशच्या आयुष्यात आले ....
"खुशी/आनंद/सुख"

त्यामुळे माणूस जेव्हा जेव्हा 'स्व' पलीकडे जाऊन बघतो तेव्हा त्याच्या आनंदाच्या कक्षा दुपटीने  विस्तारतात...  आणि म्हणून कित्येक कडवट रात्रीनंतर सुरेशच्या एका पुढाकाराने  ती रात्र 'माझी' ठरली .....


(वरती वापरलेले "मी, माझी, मला" हे शब्द "आनंद, ख़ुशी, सुख: या अर्थाने वापरले आहे. )

ती रात्र 'माझी' ठरली .....

by on जुलै ११, २०१८
कुटंबातल्या नात्यांत... धागे गुंततात, उलगडायला वेळ लागतो. एकत्र जोडुन धरायला वेळ लागतो की, मग उलगडणं महत्वाचं वाटत नाही ? असमान आसमंत अ...
"स्पर्शून माझ्या सर्वांगाला ... 

सुगंध तुझा अलवार आहे ... 

तू घे सावरून स्वतःला...  

मला सावरने आज शक्य नाही... "
मी पावसाबरोबरच बोलत होते. पर्याय नव्हता नं, सोबत्याने दुसरा पर्याय तरी ठेवला होता का?  सोबत्याला आज भेटणं शक्य नव्हतं म्हणे...
त्यामुळे मी पावसाशी बोलूनच थोड्याशा तनहाईचं सेलेब्रेशन करत होते ...;.
पावसा, चेहर्यावरून अलवार सरकून आतपर्यन्त माझ्या नसनसात गेलास तू ...
हात मोकळे करून सारे विश्व कवेत घेत होते मी ...
त्यात हा विजांचा कडकडाट, पावसा तू मला घाबरून देत होतास ... एकटी असल्याचा हा जुलमी फायदा तू घेत होतास, पण कोणाला काय पडलं नं! मी या रोमॅन्टिकपणात माझा 'हक्क' मिस्स करत होते...
त्या थंडाव्याने गारठून मी जात होते ...
तरी मन माझे मानत नव्हते पावसा तुला सोडायला ...
हट्ट सोबत्याचे कितीदा पुरवून तुझ्यात ना भिजले मी ...
माझे हे तुझ्यात भिजणे किती त्याला मोहित करायचे माहिते.? पण माझ्यात विरघळायचा हक्क फक्त त्याचा, म्हणून तुझ्या विजेपेक्षाही कडाडून चिडायचा हा तुझ्यावर...
पण मी अशी गुंतलेले केस मोकळे करत यायचे, ते तो पहातच राहायचा.... त्यामुळे का होईना थोडा आवडायचास त्याला तु... काय म्हणायचा माहिते, शब्दांनी खोटं नाही बोलवत म्हणणार होतो सुंदर दिसतेय पण यार्र मादक दिसतेयस तू. सांभाळ स्वतःला... पण्ण केसांतून झटकताना हळूहळू गारातून पडणारे थेंब त्यालाच इतके माझ्याजवळ ओढायचे की मला त्याला सांभाळावं लागायचं... आणि त्याला सांभाळण्याच्या त्या प्लानमधून जवळ घेण्याच्या त्याच्या आकर्षणात मी स्वतःला शातीरपणे सोडवून जी घ्यायचे ...
माझ्या अंगावर थेंब पडायचे, तो त्या पावसाला नावे ठेवायचास ..." हक्क तुझ्यावर फक्त माझा आहे" कित्ती आतून तो म्हणायचा....अशा क्षणी माझं तुझ्यावरचं प्रेम ऊफाळुन यायचं ते इतकं...
आज तू पडताना झेलत होते पावसा तुझे  टभुऱे थेंब  ... तरीही सोबत्या तुला शोधत होते मी  कुठेतरी मागे पुढे सगळीकडे ...
पावसात हे सगळं जे होतं जन्नत होतं .. या आजच्या पावसात तोच नव्हता ... अपूर्ण काय ते हेच होतं ...!
डोळे बंद करून पावसाला मी संपूर्ण चेहर्यावर, अंगावर, मनापर्यंतही पोहोचू दिलं ...वाटलं चिडचिड होऊन तो भेटायला तरी येईल...  पण ... तो आलाच नाही.
शेवटी वैतागून, थंडीने कडकडून आमच्या नेहमीच्या टपरीवर त्याच्या विचारात त्याचा संताप करत एक फक्कड अद्रक चाय सांगितली... "क्या म्याडम, साब नहीं आयें...?" नेमक्का चायवाला बोलला...
"याला आजच साब आठवतोय नेमका..."
मी चहावाल्याला सर्रळ इग्नोर केलं....
केस मोकळे करून दातात क्लिप अडकवून बांधता बांधता विचारच करत होते, त्या विचारांना बाजूला सारून बघते तर्र काय ...? समोर.... तो .... :O
व्हॉट्ट.... I was like what the ***  तोंड उघडं ते उघडंच, तोंडातला क्लिप जसाच्या तसा खाली पडला पण्ण मग वाटलं भास होऊच शकतो हा गेला खड्ड्यात मला काय फरक पडत नाही... मी इग्नोर केलं... पुन्हा खरचं तो होता का या अनपेक्षेने पहायला गेले ... तो खर्रच... खर्रच खर्रच तो होता....
पण्ण त्यातही मला आठवलं मी चिडलेली आहे, त्यामुळे सगळी एक्साईटमेन्ट सगळे किसेस हग्ज दूर डोंगरावर नेऊन ठेवत मी त्याला म्हटलं,
"उशीर झाला तुला ... एक पाऊस उधार ठेवला तुझ्यावर आज मी ...निघते बाय भेटू पुन्हा तुझ्या सवडीने!'  ... नि निघणार तोच मागून हात धरून तो म्हणाला,
"ए- जान-ए-मन... पाऊस आहे तो आणि मी 'मी' आहे कळलं.... त्या पावसाला माझ्याशी जिंकण सोप्प नाहीए हे पक्क डोक्यात फिट करून घे.?"
त्याच आनंदाला लपवून चिडक्या सुरात मीही म्हटलं "ए चल्ल हट्ट जेअलस मुलगा.. दुर होके भी एहसास उसका आबाद हैं... तु आत्ता आलयंस पावसातही आणि आयुष्यातही." 
"ए - नाजनीन! कसं आहे ना... असे कित्येक क्षण माझ्या वाट्याला आले आहेत, ज्यात फक्त तू आणि मीच होतो ... तो कितीही जूना असला तरी त्याला 'मी' होणं शक्य नाही आणि तुला त्याच्यावर ' माझ्यावर करते ते प्रेम' करणं शक्य नाही....आणि उलट खरं सांगायचं तर आज थोडावेळासाठी काय त्याला 'तुझ असणं उधार दिलं' इतकंच काय घडलं.. त्यामुळे उधारी त्याची माझ्याकडे झालीय ... त्यामुळे तू जाऊ नकोस लग्गेच तो आत्ता पडेल आणि पडेलच देखना तुम .. ठरलंय तसं."
मी स्तब्ध म्हणजे त्याच्या त्या बोलण्याने काय बोलावं समजेना...  चिडचिड कद्धिच संपली होती. मला खूप नवं वाटत होतं... मी त्याच्या नजरेशी नजरच मिळवू शकत नव्हते, कारण मुळात हे सगळं फार परीकथेसारखं असलं तरी खोटं वाटत होतं मला..
अशातच इकडे तिकडे पाहत होते, त्याच्यावर चिडून आणिया निसर्गावरही... तितक्यात  वाऱ्याने काय ते सुखद खुणावलं, वार्याच्या थंडाव्यात विश्वास नाही बसला पण हळूहळू पावसाचे थेंब मला स्पर्शून जाऊ लागले ... वाढून विरळविरळ म्हणत त्या थेंबानी मला तो समोर दिसेनासा झाला... पण पावसाच्या या जोरदार मीठीत मला स्पर्श भावना आणि श्वासांत सुवास होता त्याने घट्ट पकडलेल्या माझ्या हातांचा... त्याचं  पडणं माझ्या नजरेगणिक जास्त जास्त वाढायला लागलं होतं. मी चिडलेली हळूहळू ओसरायला लागले होते पण मनातून ठरलं होतं त्याच्यासमोर ओसरायचं नाहीचे...
हळूहळू हळूहळू येणारा तो आता पूर्ण धाडधाड कोसळायला लागला... आणि थोड्यावेळाने भानावर येऊन शेजारी याच्याकडे पाहिलं, गर्वाने निरागसपणे काय पाहत होता तो माझ्याकडे मला समजलं नाही पण्ण त्या भर टपरीवर, मोकळ्या आसमंतात, माणसांच्या गर्दीत, माझ्या केसांतून तरळणार्या केसांच्या बटेला मागे सारत," माफ कर ना जीवा ¡ .... पुन्हा चुकूनही ही चूक नाही होणार .... एक्स्ट्रीअमली सॉरी नं ..."
"ही चूक नाही म्हणजे नवी चूक करणार तु ..." मी जोरात खोटंखोटं रागावले...
डोळे बारीक केविलवाणे करून पाहतच राहिला की तो .... आणि एकसाथ जे हसलो दोघे ....
पावसा खास है तू !
दोघांनी सोबत वरती पाहीलं त्याने माझ्यासोबत पावसाला अनुभवलं नि
' तू आज पुन्हा एकत्र आणलंस आम्हाला.' म्हणून मी पावसाचा शुक्रिया अदा केला
"उधारी आमच्याकडे तुझी राहीली नेहमीसारखीच." म्हणून अलविदा करत बिनदिक्कत स्वार्थी बनून मी याच्या मीठीत विसरून गेले  पावसालाही....


उधार पाऊस ...!

by on जून २१, २०१८
"स्पर्शून माझ्या सर्वांगाला ...  सुगंध तुझा अलवार आहे ...  तू घे सावरून स्वतःला...   मला सावरने आज शक्य नाही... " मी...
आम्ही दोघेही पडल्या पडल्या गुणगुणत होतो,

'रूह से चाहने वाले आशिक़,
बातें जिस्मों की करतें नहीं...|'


रेडिओवर चाललेलं हे गाणं ऐकता ऐकता त्याच्या केसांत बोटं फिरवत मी सहजच त्याला म्हटलं,
"जर का मीही आयुष्यात ही अशी चूक केली तर.?"
"तुला कळतंय ना तू काय म्हणतेय ?" तो अच्चानक अग्रेसिव्ह होऊन उठलाच...
"अब्सुल्युटली... सांग ना नेमकं काय होईल तु मला सोडून जाशील.?, मी सहजच म्हणत होते.
"तसा कुणी आहे का.?" त्याला पटापट साताठदहा प्रश्न विचारायचे होते लक्षात आलं माझ्या.
"असेलही. तुझ्या उत्तरावर पुढे सांगायचे की नाही ठरेल." मी त्याची फिरकी घेण्याच्या मूडमध्ये म्हटलं.
"तु असा जीव टांगणीला का लावतेयस.? आधी सांग काय झालंय नेमकं...? हॅव यू किस्ड इच अदर ?"
"डोन्ट गेट पजेसिव्ह. शांततेत बोलूया या विषयावर?" त्याने डायरेक्ट किस्सबद्दल विचारलं तेव्हा ठरवलं आता सिरियस्लीच बोलण्याची गरज आहे.
"हो... डिपेंड करतं की तू नेमकं काय केलयं.?" त्याचा दृष्टीकोण त्याच्या उत्तरांतून अजून जास्त कळत चालला होता. मीही कंटिन्यू केलं.
"आर यू सिरियस ? म्हणजे तु म्हणतोयस की, तु मी काहीतरी केलंय यावरून आपलं इतक्या वर्षांच नातं तोडून टाकशील.?
म्हणजे मीठी मारली असेल तर कशी मिठी?, कितीवेळ आणि का ? ? किंवा मग किस्स असेल तर कसा किस.? लिपलॉक की गालावर...? किंवा त्यापुढे इफ वी एन्ड अप इन बेड मग तर तिथे तु कुठलीच शक्यता न ठेवता ते नातं तोडून टाकणार असंच नं ...?"
"इट्स ऑब्वियस माय लव्ह!" हे त्याने ज्या टोनमध्ये म्हटलं, त्याने माझा राग वाढत चालला होता. कारण त्याला माझी याबद्दलची मतं, दृष्टीकोण चांगलाच माहिती होता. त्यामुळे त्याच्याकडून येणाऱ्या प्रत्येक उत्तरावर मी शॉक होत होते. तरीही धुसर सगळं स्पष्ट व्हावं म्हणून मी प्रश्न विचारला...
"ओह्के...! आणि जर का आम्ही हे सगळं केलं असेल म्हणजे मीठीत घेण्यापासून किसपर्यंत आणि त्याहीपुढे जाऊन तु जो विचार करतोय तेही घडलं असेल तर.?"
"_______" तो काहीच बोलला नाही.
मी कंटिन्यू केलं,"आणि जर का तसं काही आमच्यामध्ये घडलं असेल आणि यापुढे आम्ही एकमेकांना भेटणारही नसू असं ठरवलं असेल तर? त्यामुळे यापुढे आमचा एकमेकांशी कसलाच संबंध येणार नसेल. तरीही तुला प्रोब्लेम असेल.?"
"तु आता खरंच माझ्या डोक्यात जातेयस. मला सुचत नाहीये काय बोलू... मला क्लियर सांग काय झालं आहे नेमकं.?"
"उम्म्म्मम्मम्मम,
मी फक्त विचार करत होते की जर लोकं म्हणतात, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या त्या दोन्ही व्यक्तींनी एकमेकांशी प्रामाणिक असलं पाहिजे. त्यातील एकाही व्यक्तीने त्या व्यक्तीव्यतिरिक्त तिऱ्हाइत व्यक्तीशी नातेसंबध (स्पष्टच म्हणायचे तर लैंगिकसंबंध) ठेवले तर ती व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीला फसवत असते."
त्याच्या चेहऱ्यावरचे भाव माझ्या प्रत्येक वाक्याला बदलत होते ... मी बोलत राहिले...
"पण मी खूप दिवसांपासून गोंधळात पडलेय. म्हणजे बघ हां नात्यात असलेली ती व्यक्ती आणि तिऱ्हाइत व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यांच आकर्षण कुठल्याच मार्गाने भावनिक नसतं. त्यामुळे त्यांच्या आकर्षणात निव्वळ निव्वळ ओढाताण असते एकमेकांच्या शरिराची. आणि ते आकर्षण थांबणही शक्य नसतं मग एका अशा अघोऱ्या क्षणी ती दोघे तो क्षण बिनधास्त अनुभवून घेतात. काही बेफिकिरीने, काही गिल्टने ..."
"तुझा मुद्दा कळेल मला स्पष्ट.? तु या विषयाबद्दल सकारात्मक दृष्टीकोण मांडून स्वतः जे काही केलंय त्याचं समर्थन करत नाहीयेस बरोबर?"
"आधी मला बोलू दे पूर्ण !
म्हणजे बघ नं मी एकदा तुला विचारलं होतं की, एखादी व्यक्ती आपल्याला का आवडू लागते.? किंवा त्याच व्यक्तीच्या प्रेमात आपण का पडतो.? तेव्हा तुच म्हणाला होतास नां, 'प्रेम हे भावनिक टेलिपथी जुळल्यावर, विचार जुळल्यावर होतं. असं खूप कमी व्यक्तींबद्दल वाटतं आयुष्यात. आणि माझ्यासाठी ती व्यक्ती 'तु' आहेस...'
तर मग तुझ्या म्हणण्याप्रमाणे विचार केला तर मला एक प्रश्न सारखा पडतोय की, तिऱ्हाइत व्यक्तीने तुझ्या प्रिय व्यक्तीच्या निव्वळ त्वचा म्हणवणाऱ्या त्या शरीराला स्पर्श केला तर तु नातं तोडण्याचा इतका टोकाचा निर्णय का घेतोस.?"
"मला ना...______"
"तु थांब ... तुला आत्ता काही बोलता येणार नाही, किंबहुना सुचणारच नाही.
मला माहितीये तुला काय म्हणायचे आहे. हेच ना की, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीच्या हक्काचा तो स्पर्श असतो. तो त्या व्यक्तीच्या नावे केलेला एक 'स्वर्गीय क्षण' असतो."माझ्या या वाक्याने त्याच्या कपाळावरच्या रागीट आठ्यांचा शीण किंचित ओसरल्याचं जाणवलं. ही फक्त एका बाजूने विचार करतेय हा त्याचा भ्रम मी त्या एका वाक्याने दूर करत पुढे बोलू लागले...
"पण मग जर मी तो क्षण दुसऱ्या कुणा व्यक्तीबरोबर अनुभवला म्हणजे त्यानंतर मी तो क्षण तुझ्याबरोबर तितक्याच गहिरेपणाने अनुभवू शकणार नाही असं काही असतं का.?...
मग तर तुझा मागच्या चार प्रेयसींबरोबर तो क्षण आधीच अनुभवून झाला आहे. मग.?"
"तुमच्यात खरंच तसं काही घडलंय का.? मी शांततेत विचारण्याचा प्रयत्न करतोय हां... तू बाकीचे संदर्भ काय सांगत बसलीयस .. कित्ती ताणवणार आहेस अजून. घडाघडा काय ते बोलून टाक ना यार्र आता..." तो अंगाशी आलेलं सगळं सावरून बोलत होता.
"बघ हं... म्हणजे सध्याच्या परिस्थितीला तुला मी खुप बालिश वाटेल. पण एवढंच सांगावंस वाटत होतं, प्रेम आहे ते. त्यात शारीरिक क्षण महत्वाचा असतोच. कदाचित तोच असा क्षण असतो जिथे ती प्रेम करणारी दोघे या दुनियेपासून, सगळ्या स्वार्थापासून दूर होतात नि एकमेकांशी शरिराने तर जोडले जातातच पण ते भावनेनेही एकत्र येतात.
आकर्षण असतं तिथे फक्त शरीर ती क्रिडा उपभोगत असतं परंतु जिथे प्रेम असतं तिथे त्या व्यक्तीचा रोमरोम ते उपभोगून सुखी होत असतो. याशिवाय हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न की त्याने कुणाबरोबर शारीरिक संबंध ठेवावे.
पण आपल्या नात्यात, आतापर्यंतच्या या नाजूक संवादात मला अपेक्षा होती की, तू एकदा तरी काळजीपोटी विचारशील की,' तु तुझ्या मर्जीने तो क्षण अनुभवलास का.? किंवा कोण आहे तो मुलगा..? असं का घडलं अचानक.? किंवा मग माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तु असं काही करणारच नाहीस... किंवा तसं काही घडलंय तर मला नीट सांग काय झालं आहे, आपण त्यावर सोल्युशन काढू...
आणि सोल्युशन काही उरलंच नसतं तेव्हा तु खुशाल त्या नात्यापासून मोकळा झाला असता तर काहीच वाटलं नसतं.
पण्ण नाही तुला फक्त तो क्षण ऐकायचा होता नि त्यापुढे मी बोलायला सुरुवात केल्यापासून तुझ्या मनात ब्रेकअप ठरलंच होतं.
आपला संवाद सुरु झाल्या झाल्या तुझं ते ओव्हरपजेसिव्ह होणं मी मान्यही केलं कारण मला माहितीये प्रेम हे आकर्षणाशिवाय पुर्ण होणारे का ...? पण त्यानंतर तु ज्या अतिअविश्वासाने सगळं काही बोललास त्यामुळे मी मुद्दाम हे विरुद्ध फासे टाकले आणि तुझा 'नात्याचा आदर करतो. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे वगैरे वगैरे वगैरे' मुखवटे अस्से गळून पडले त्यावरून तरी वाटतंय मीच कुठेतरी या नात्याचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे.
बाय द वे, मी फक्त त्या गाण्याचे शब्द ऐकले,
"रुह से चाहने वाले आशिक़,
बातें जिस्मों की करतें नहीं...|"
नि कल्पनेने तुला हा प्रश्न विचारला.
पण या तुझ्या एकंदरीत अज्ञानी रिॲक्शनवरून एक सांगावसं वाटतंय,
"रुह और जिस्म पत्तीया दोनों एकही पेड कीं है।
दोनों के बीच एक बारीकसा धागा हैं उसें समझने में जल्दबाजी कर दीं हैं तुमनें|"

त्यामुळे शरीर आणि आत्म्यातील तो धागा शोध,
समज,
आत्मसात कर,
त्यातील वास्तव 'प्रत्यक्षात' पचव,
मग भेटू आपण...
बाय!

 मेरे बस दस प्रतिशत हिस्से से वाकिफ़ हो तुम, फिर कभी मिलेंगे॥



                                                           



रिटच रूह

by on मे २६, २०१८
आम्ही दोघेही पडल्या पडल्या गुणगुणत होतो, 'रूह से चाहने वाले आशिक़, बातें जिस्मों की करतें नहीं...|' रेडिओवर चाललेलं हे गाणं ऐकत...