Sufi: स्वच्छ संस्था
स्वच्छ संस्था लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्वच्छ संस्था लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा


तुम्ही फेकलेला कचरा परतून तुमच्याकडेच आणि तुमच्या घातक पर्यावरणातच येणार आहे. त्यामुळे फेकले म्हणून नष्ट झाले या प्रकारात प्लास्टिकचा कचरा मोडत नाही. आणि पुन्हा, प्लास्टिक कचऱ्याचा उल्लेख झाला म्हणजे सॅनिटरी पॅड्स आलेच. पण आपण याबाबतीत किती निष्ठुरपणे वागत आहोत, कशी याचे निरीक्षण केले आहे. याचे सखोल स्वरूप;

वापरलेल्या सॅनिटरी पॅड्सच्या कचऱ्याची विल्हेवाट

सॅनिटरी पॅड वापरा असे सगळ्याच पातळीवर सांगितले जात आहे. कसे वापरायचे तेही सॅनिटरी पॅडच्या पुड्यावर चित्राच्या स्वरूपात दाखविले जाते. पण सॅनिटरी पॅड लावल्यानंतर, स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेतल्यानंतर त्या माखलेल्या पॅडचे पुढे काय ….?
आपण पॅड वापरले म्हणजे आपली जबाबदारी संपते, असे समजून महिला सॅनिटरी पॅड्स किंवा डायपर आहे तसेच, ओल्या स्वरूपात, न गुंडाळता सर्रास टाकून देतात.

जेव्हा सॅनिटरी पॅडच्या कचऱ्याबाबत कर्मचाऱ्यांशी बोलले तेव्हा समोर आले कि,
प्रमुख मुद्दा म्हणजे आजही मोठमोठाल्या घरांतून कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नाही. त्यात सॅनिटरी पॅड्स, डायपर हे उघड्यावर तसेच टाकले जातात. तो कोरड्या कचऱ्यात समाविष्ट होतात. पण हे डायपर आणि सॅनिटरी पॅड्स नियमितपणे हाताला लागू लागले. शास्त्रीय दृष्टिकोनातून सॅनिटरी पॅड्सचे तीन-चार तासांत जंतू निर्माण होतात. त्यात हायपोटसीस, इकॉलाय, साल्मोनीय, स्टॅफिलोकॉकस आणि कावीळ व टिटॅनसच्या रोगजनकांचा समावेश असतो. ते जंतू कामगारांच्या आरोग्यास हानी पोहचवतात. यामुळे कर्मचाऱ्यांचे स्वास्थ्य बिघडते. कर्मचाऱ्यांचे म्हणणे असे कि, त्या आजारी पडू लागल्या. वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सची हाताळणी स्त्री सफाई कामगार करत असतात. त्या घरातील एकट्या कमावत्या असतात . त्यामुळे त्यांच्या आजारपणावर होणारा  खर्च आणि रजा घेतल्यामुळे पगारात पैसे कमी केले जातात. थोडक्यात, घरातील कमावती स्त्री आजारी पडल्यामुळे घरातील आर्थिक बाबी ठप्प होत असे.

कचरा कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम
सफाई करणार्‍या कामगारांनासुद्धा या धोक्याची पूर्ण कल्पना आहे. "परंतु लोकांची घाण उपसणे हा आमचा व्यवसाय आहे. तसे न केल्यास आम्ही उपाशी मरू. पहिल्या पहिल्यांदा आम्हालाही शिळ्या अन्न पदार्थातील किड्या-मुंग्यांना बघितल्यावर शिसारीकिळस  येत होती. मळमळल्यासारखे वाटत होते. आता त्याची सवय झाली आहे. आम्ही त्याची काळजी करत बसत नाही. मात्र रक्तानी मळलेला कापूस, सॅनिटरी नॅपकिन्स वा फेकून दिलेले बँडेजची फार भीती वाटते. आजारपण वा दवाखाना आम्हाला परवडत नाही. कचऱ्यातील कचरा उचलताना काचेच्या तुकड्यामुळे आमचे हात कापतात. तरीसुद्धा आम्ही घाबरत नाही. परंतु सॅनिटरी टॉवेल्समुळे आजारी पडल्यास आमच्या लेकरांकडे कोण बघणार?"
वापरून फेकून देत असलेल्या नॅपकिन्सच्या संख्यांचा विचार केल्यास दररोज प्रदूषणात किती भर पडत आहे याची नक्कीच कल्पना येईल. 2011 साली केलेल्या निरीक्षणाच्या आकडेवारीनुसार भारतात केवळ 12 टक्के स्त्रिया ब्रँडेड नॅपकिन्सचा वापर करतात. 15 ते 54 वयोगटातील 30 कोटी भारतीय स्त्रियांपैकी 12 टक्के म्हटले तरी ही संख्या 3.6 कोटी स्त्रिया नॅपकिन्स वापरत असावेत. दर महिन्याला 12 नॅपकिन्स या हिशोबाने वापरलेल्या 43.2 कोटी नॅपकिन्सचे वजनच 5000 टन होईल. हे सर्व नॅपकिन्स जमिनीवर पसरल्यास 50 एकर जागासुद्धा पुरत नाही. शिवाय. हा कचरा हाताळताना दुर्गंध आणि जंतूंचा संसर्ग यामुळे आजार होऊन अनेक स्त्रिया सुट्टीवर असतात. त्यांचा हा संसर्ग घरातील त्यांच्या मुला बाळांना ही होतो.
सर्वेक्षणानुसार पुण्यात रोज 250000 सॅनिटरी नॅपकिन्स वापरून फेकल्या जात आहे. अशा प्रकारे नॅपकिन्स गटारात वा नाल्यात फेकल्यामुळे गटारं तुंबतात. किंवा फुटपाथवर पसरतात. रस्त्यावरील बेवारशी कुत्रं पॅक कुरतडत पसरवतात. पुण्यातच नव्हे तर भारतातील बहुतेक शहरात हे दृश्य बघायला मिळते. कचराकुंडीत टाकलेल्या कचर्‍याची सुका व ओला यात विभागणी सफाई कामगार करतात. अशा वेळी गुंडाळलेले पॅक्स हाताळताना या कामगारांना ते किळसवाणे वाटत असेल. त्यांनाही काही स्वाभिमान असेल. श्रम प्रतिष्ठा असेल. परंतु याचा विचार न करता कचराकुंडीत बिनधास्तपणे टॉवेल्स फेकणार्‍या स्त्रियांची संख्या कमी नाही.याच सर्वेक्षणात लक्षणीय प्रमाणात महिला असलेल्या कार्यालय/कंपन्यापैकी 63 टक्के कार्यालयात नॅपकिन्सच्या विल्हेवाटीची कुठलीही सोय नाही. त्यामुळे संडासातच (बळे बळे!) पॅक ढकलून देत असतात. कारण त्यांना वापरलेले नॅपकिन्स कागदात गुंडाळून जवळ बाळगण्यास लाज वाटते.

कचऱ्यासाठी उपाययोजना
द प्लास्टिक वेस्ट (मॅनेजमेंट अँड हँडलिंग) नियम २०११ या नियमात विस्तारित उत्पादकांच्या जबाबदार्या (ERP) संबंधी काही मार्गदर्शक कलमे आहेत. त्या कलमानुसार पर्यावरणाला हानी न पोहोचता उत्पादनांच्या वापरातून होणाऱ्या कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट करण्याची जबाबदारी उत्पादकावर सोपवली आहे. परंतु हे उत्पादनकर्ते या जबाबदाऱ्या घेत नाहीत. टाळतात. जर सॅनिटरी पॅड्सच्या पाकिटातच ते वापरल्यानंतर टाकण्यासाठी एक पाऊच दिले तर कर्मचाऱयांसाठी हे किती सोयीस्कर होईल.

कर्मचाऱ्यांकरिता पर्याय म्हणून;


·         डिस्पोजल पाऊच: म्हणजेच उत्पादकांनी पॅड विक्री करताना पॅकिंगच्या आतच वापरलेले पॅड फेकण्यासाठी पिशवी दिली जावी.

·         रेड डॉट कॅम्पेन: या उपक्रमातून माखलेल्या पॅड हे वृत्तपत्रात किंवा कागदात गुंडाळून त्यावर लाल टिम्ब टाकून कचरा पेटित टाकावे.

·         सरकारतर्फे हातात घालण्याचे ग्लव्हज, आणि तोंडाला लावण्याचे मास्क तसेच स्वच्छ संस्थेमार्फत ज्या पद्धतीने कौटुंबिक आरोग्याबाबत समस्या असल्यास ५०% सवलत कार्ड देऊ करावे. जेणेकरून हे काम जितके आरोग्यास घटक असते त्या बदल्यात कर्मचाऱ्यांची देखरेख ठेवली तर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या कमी होतील.

·        सॅनिटरी नॅपकिन्सच्या निर्मुलनाचा वैज्ञानिक मार्ग म्हणजे इन्सिनरेशन.: जनआधार सेवाभावी संस्थेद्वारे पुणे शहरातील पाच प्रभागात सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजल मशीन बसविले गेले आहेत. ज्याद्वारे दररोज २८०० ते ३००० पर्यंत सॅनिटरी नॅपकिन्सची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.


सॅनिटरी पॅड्सच्या कचऱ्यात तुम्ही राहू शकता का ?

by on जून ०१, २०१९
तुम्ही फेकलेला कचरा परतून तुमच्याकडेच आणि तुमच्या घातक पर्यावरणातच येणार आहे. त्यामुळे फेकले म्हणून नष्ट झाले या प्रकारात प्लास्टिकचा...