रोझपेक्षा वेगळा डे !!! - Sufi

रोझपेक्षा वेगळा डे !!!

त्याने सफेद गुलाब दिलं....

पण मला लालच हवं होतं...



म्हणून मग मी त्या गुलाबाला सफेद म्हणू ,पांढर म्हणू कि ढवळ म्हणू कळत नव्हतं....
मी तोंड वाकड केलं नशीब त्याला कळलं.
त्याने विचारलं "याचा अर्थ काय.... ?"
मी आधीच खुssssप चिडले होते. वर त्याने हा असा प्रश्न विचारला.... तो म्हणतो तसं डोळ्यांत रागाच मडकं भरलं होत माझ्या...
मी त्याला प्रत्युत्तर केलं,"तुझं तुच ठरवं , मला काय विचारतो ? याचा अर्थ काय म्हणे ? ....पण तुला खरचं लाल गुलाब नाही आणवलं ? तुला ना कळतच नाही...दिवस कोणता? महत्व काय ... तु ना ... "
"शूऽऽ.....एकदम चुप्प्प.... " त्याने मला शांत केलं.
माझा हात हातात घेतला. त्या रागाने भरलेल्या मडक्यात प्रेमाचे थेंब ओतावे तेवढ्या आर्ततेने बघत तो म्हणाला, " बाळा, हे गुलाब कुणाला देतात, माहिते ?
मी सांगतो, आपण सफेद गुलाब त्या व्यक्तीला देतो , ज्या व्यक्तीबद्दलच प्रेम अविरत,अखंड,अमर्याद नि निर्मळ या तुझ्या शब्दांच्या चौकटीपल्याड असतं. जिथे प्रेम व्यक्त करायला शब्द अपुरे असतात. 'आईवर जेवढ निस्वार्थी प्रेम करतो तेवढच तुझ्यावरही करतो ' हे सांगण्यासाठी हे खास सफेद गुलाब .... पण खर सांगु? माझ्या या लालबुंद गुलाबासमोर हे माझ विकतचं गुलाबही रंग गाळून बसलय गं.."
            "एएएsss अजिबात हसू नकोस एएएssss नक्को ना ... तो लाल रंग गुलाबी व्हायला लागला बघ ... आतातरी समजलं सफेदच गुलाब का ? "
           ईश्यय्य्य . हे काय होतं.. एक सेकंद काय बोलाव सुचेच ना ....मेरे ओठों की हँसी आँखोंतक पोहोंच गयी...त्याच्या भावनेने स्तब्द झाले मी ....लाजेने चुर झाले होते,ओशाळले होते मी. ज्याला किनारा समजत होते, तो तर प्रेमाचा अख्खा समुद्र घेऊन उभा होता ...
मी ओठ चावत,लाजत ,डोळ्यात माफीचा भाव आणत, त्याच्या कानात म्हटल .....
.
"ते सगळ ठिके पण मग अजुन एक फुल आणलं असतं तर? काय झाल असत हां ? लालही नि पांढराही ? "
माझ्या या चौकस बिनबुडाच्या प्रश्नावर दोघे मनमुराद हसलो नि त्याच्या नजरेत माझा गुलाब फुलला...
फूलोंके रंगों में मैंने सिर्फ रंग तराशे । उसने आज उन्ही रंगोंमें मुझे ढूंड लिया  ।।
नयी थी मै|

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा