Sufi: Love
Love लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Love लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

खरंच एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीच्या खूप जवळ असणं, किती तोट्याच असतं. तो येऊन केवळ त्याचं दुःख शेअर करतो.
त्याचा वेळ मात्र तो इतरांना देतो. त्या इतरांना दिलेल्या वेळेतील दुःख, वेदना आणि उणेधुणे वाटण्यासाठीही पुन्हा आपण जवळचे बनतो. कधीतरी त्याचा वेळ मिळावा यासाठी त्रयस्थ बनाव वाटतं. एखादा अनोळखी सहकारी?

कारण सततच्या त्याच भूमिकेत राहून बोथट होण्यापेक्षा सुखातला तो बघता, अनुभवता यावा, ही मनोमनी दुःखद वेदना सलते कधीतरी हळूच. पण त्याला आपण नेहमीचे झालेले असतो आणि त्याच्या दुःखाच्या भावनांना आपली सवय ! एवढीच काय ती घट्ट मिठी हळूहळू उरते, कुरवाळली जाते, दुःखाची मिठी...! 

बघताना प्रियकर प्रेयसीचे नाते सुंदर वाटते. पण प्रत्यक्ष ते एकमेकांचे आधार बनतात, सोबती बनण्याची चूक ते करत जातात. प्रेमाच्या सुरुवातीला साथी बनण्याची स्वप्न मिळून पाहतात. स्वप्न साकार करू लागतात, एक-एक म्हणत आपापल्या करियरमध्ये उंची गाठतात, पण कधीतरी चुकून दोघे सोबत सायंकाळी नोकरीवरून लवकर घरी परतताना आवडणारा रोमँटिक पाऊस आता बालिश वाटू लागतो... लॅपटॉप भिजतो म्हणून त्या पावसात भिजण्याचा स्वांत आनंद त्या ढगात रिव्हर्स जातो. ओलावा निघून जाऊन त्याची ओल उरते केवळ!

शेवटी हळूहळू नोकरीच्या आधीन होऊन नातं सुटत जातं. पण नातं तुटत नाही. प्रेम संपलेल नसतंच कधी, ना ते संपाव अशी मनी भावना येते. यात मात्र कधीतरी त्याचं प्रेम उफाळुन येतं तेव्हा ती कामात व्यग्र असते, तर कधीतरी तिचं प्रेम उफाळुन येतं तेव्हा तो मग्न असतो. प्रेमाच्या प्रोपोजच्या क्षणी आयुष्यात एकदाच आणि शेवटचं प्रियकर प्रेयसी या दोघांना एकावेळी प्रेम होतं. त्यानंतर एकदा एकाला तर दुसऱ्यांदा दुसऱ्याला. त्यामुळे कधीतरी दोघांचा एकमेकांना वेळ मिळावा, यासाठी त्रयस्थ बनाव वाटतं.

नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे ' जवळचे ' होण्यापेक्षा त्याचे सहकारी व्हावं वाटतं. "सहकाऱ्यांसाठी नाते फेक असते, प्रेम करणाऱ्यासाठी नाही" हा आनंद प्रेम करणाऱ्याने आतून कितीदा वाटून घ्यावा?. सगळ्याच गोष्टींची उकल त्याच्याकडे येऊन केली जाते पण त्यात सगळचं रुक्ष आणि कोरडे असते.  प्रेम करणाऱ्याला त्याचा आनंद, त्याचं समाधान आणि शांत तो कधीच अनुभवता येत नाही.
चंद्राचं नेहमी आकाश होण्यापेक्षा चांदणी व्हावं वाटतं!
मंदिरातला देव होण्यापेक्षा एक भक्त व्हावं वाटतं... !
मंदिराला भक्तांची आस असते, देव रोजचाच झालेला असतो. ! त्यामुळे कधीतरी फक्त कधीतरी
सोबत्याचा आधार होण्यापेक्षा सोबतीन व्हावं वाटतं! 

- पूजा ढेरिंगे
इमेज सोर्स: इंटरनेट

दुःखाची मिठी!

by on ऑगस्ट २४, २०१९
खरंच एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीच्या खूप जवळ असणं, किती तोट्याच असतं. तो येऊन केवळ त्याचं दुःख शेअर करतो. त्याचा वेळ मात्र तो इतरांना ...