Sufi: महफ़िल-ए-मोहब्बत
महफ़िल-ए-मोहब्बत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महफ़िल-ए-मोहब्बत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आज खूप दिवसांनी त्याची आठवण झाली ...प्रेम बीम नसावच ते, पण मला तो आवडायचा... त्याच्या मित्रांमुळे मला तो आवडायला लागला. मी बघितलं आणि त्याच्या मित्रांनी मला बघितलं. इथेच माझे कॉलेजचे दिवस सुरू झाले. मग मला कुछ कुछ होता है पण आवडला, नि राजा हिंदुस्थानीही आवडला.
कॉलेजमध्ये आपली पण एखादी लव्हस्टोरी असावी म्हणून ते प्रेम होत बहुदा... ! घरचे म्हणता म्हणून लग्नासाठी पोरगा बघावा तसं त्याचे मित्र आम्हाला चिडवता म्हणून आमची पण लव्हस्टोरी असावी. एवढा साधा आयुष्याचा मोटो होता. म्हणून एकच ध्येय, की त्याच्याबरोबर निदान पुढच्या इयत्तेत जाण्याएवढा अभ्यास करावा. मग त्यात कोणत्याही सरांची बोलणी खावी, अगदी गोड वाटायचं सगळं...
         खरं सांगायचं तर, त्यावेळी ना फेमची भूक, ना रीचनेसची बाडबिस्तर, नाही शाइनिंगची दुकान ... त्याने फक्त आहे तसं स्वीकाराव नि त्याच्या मित्रांनी असच जोडीनं चिडवत राहावं इतकंच काय ते वाटायचे. एकवेळेला स्वीकारलं नाही तरी चालेल, पण एकवार त्याने ते गोंडस हसून पहाव इतकंच. वेड होतं ते पुरतं. आजच्या रिचनेसमध्ये मी त्याच्या रिचस्माइलवर मरत होते. आजही ते सगळं आठवून स्वतःला निरागस बावळट म्हणण्याचा चान्स मी सोडत नाही.
          हॅहॅहॅ.... तो गॅदरिंगचा दिवस कसा विसरू!  ....कधी नाही ते साडी घालायचं मनावर घेतल. का ते सांगू नाही शकत. इश्श लाज वगैरे वाटते जरा. अशातच तो भरमसाठ झगा गावभर घेऊन कॉलेजपर्यंत जायचं, 'वैसे उसके लिए ना सही, लेकिन उसके एक झलक के लिये इतना तो बनता था यार' ...मी छान तयार होऊन गेले. मी सांगते, वायफळ तयार होणं होत ते.... टोटल वायफळ ! आयुष्यातला व्यर्थ दिवस.
          आमच्या एकतर्फ्या प्रेमाची चर्चा गावभर नसली तरी ग्रूपभर होती. त्यामुळे त्यांना आयता बकरा मिळाला होता....त्यांच्या चिडवण्याचा मला काडीमात्र फरक पडत नव्हता. फक्त तो का दिसत नाही?, एवढ एकच एक मनात घोळत होतं. कॉलेजमध्ये घुसल्यापासून डोळ्यात फक्त त्याची झलक होती. पण तो दिसायला तयार नव्हता. तसं कॉलेजच्या दिवसांत 'आपणही सुंदर दिसु शकतो हे ध्यानीमनीही नव्हतं'. त्याच काळात ती गारव्या हिरव्या रंगाची साडी, ओठांना लाल रंग, चेहऱ्याच्या कातडीला फाउंडेशन वगैरेचा झोलच नव्हता, आपली पौंड्स पावडरच ते तेज जे खुलवायची ते लाजवाब असायचं आपल्या नैसर्गिक त्वचेला कसला धक्का लागायचा नाही. नि ब्लश ? ब्लश हे गालांना लावलं जातं हे आत्ता कळण्याचे दिवस. त्या काळात हा ब्लश आनंदाने सजवायचा तो फक्त आपल्या प्रिय व्यक्तीच्या हातून. विकत न मिळणारा हा ब्लश भलता मौल्यवान वाटायचा.
हाच ब्लश चेहऱ्यावर येत नव्हता कारण तो अजूनही कॉलेजमध्ये आला नव्हता. की मग आला होता पण मला दिसत नव्हता ? माझी हुरहूर संताप वाढत होता.  शेवटी बळीचा बकरा बनले मी ! माझं गृपमध्ये लक्ष नाही हे बघून मित्रांनी  मला तो येईपर्यंत 'अलका याग्निकच्या आवाजातल घूंगट की आड से' कंटिन्यू एकामागे एक प्रोपोगंडा राबवावा तसं ऐकायला लावलं .... न ऐकण्याच्या आविर्भावात असलेली मी मित्रांनी त्याची शपथ दिल्यावर विरघळले होते.  आणि त्या रणरणत्या तापत्या उन्हात मी एका परफेक्ट सोलमेटसारखं ते गाणं कानातून रक्त येईपर्यंत ऐकत होते, ऐकत होते, ऐकतच होते! पण मी गाण्याचा एक शब्दही ऐकला नव्हता कारण माझी नजर, कान, डोळे हे फक्त आतुर होते त्याच्यासाठी.  तरी तो दिसला नाही.  ते सहा मिनटाचं गाणं तो दिसेपर्यंत कमीतकमी सहा-सात वेळा मी ऐकलं असेल, तेव्हा कळलं किती दुख त्या चित्रपटातल्या नटीला झालं असेल जेव्हा तिच्य शृंगारानंतर तिच्या प्रियकराने तिला पाहिलं नसेल ...पण मी मुलगी असुन मी लवकर आवरून आले याला का इतका वेळ लागतोय?. माझी स्वतःवर आणि त्या झग्यावर प्रचंड चीडचिड होत होती. आणि गेस व्हॉट फायनली तो दिसला नि यांनी 'जब तक ना पडे आशिक़ की नजर' म्हणून इशारा केला.. आणि चक्क या कॉलेजच्या एका वर्षाच्या नजरानजरमध्ये पहिल्यांदा तो हसला, मला विश्वास बसेना तो हसला होता. आयेहाय....! ते हसणं, त्याचे ते ओठ जे मला बघून हसले होते, आणि ते डोळे मला बघून दुजोरा देत होते की 'तु हे माझ्यासाठी केलं आहेस आणि मला ते कतल-ए- नजर' आवडलं आहे....  वूओवssssss माझा आनंदच कमी होत नव्हता.  काय गुदगुल्या होत होत्या म्हणून सांगू, गालावरचा तो ब्लश तर ओसंडून वाहत होता. बिकाउ ब्लश असता तर या ब्लशपुढे उडून गेला असता. हा मौल्यवान होता! 
          गोष्ट एवढ्यावरच थांबली नव्हती, तो हसलाही आणि थोड्यावेळाने मित्रांबरोबर त्याने पुढे जाऊन पुन्हा एकवार वळून मागे बघितले होते त्याने . मला त्याला ओरडावंस वाटत होतं की ' वेडाये का तू ? ऐसे देखकरही मार डालोगे तुम'.अहाहाsss अलका याग्निक मानवली होती. माझं सर्वांग त्याच्या त्या 'फिरसे मुडकर देखना तुम्हारा रास आ रहा हैं हमें, युं ऐसेही देखा करो ना हमें' म्हणत त्याचं स्वागत करत होती. .... मी खूsssssप खूप खुश होते.
           माझं साडीप्रकरण गाजलं होतं.  ते आजही मन शाहळून जातं ... त्याचा तेवढाच एक फोटो मेमरीमध्ये कॅप्चर झाला जो आजही कुठली अलमारी उघडून बघावा नाही लागत. आठवण आली की समोर माझ्या तो फोटो येउन ठाकतो.
 त्यानंतर बारावी झाली, कॉलेज संपलं, ती निरागसता ते प्रेम नावाचं व्यसनही सुटलं. या मोठ्या गोष्टींच्या गर्तेत ते ऊनही विसरले नि अलका याग्निकलासुद्धा. आठवणीत होतं फक्त त्याचं गोंडस हसणं  ..बस्स ती पहिली नि शेवटची स्टेप स्वतःच्या प्रेमासाठी आणि प्रेमाच्या तसल्लीसाठी. !
अशावेळी वर्तमानात डोकावून पाहिलं की वाटतं, कुठलं प्रेम करतात आजकालची ही सात-आठवीची मुलं ...?
          मला आठवतंय, ना त्याचा हात हातात घेतला ना हिमतीनं त्याच्या डोळ्यात कधी पाहिलं. उलट त्याला पाहून ब्लश करणं नि लाजणं हाच प्रेमातला नाजूकपणा होता, जीवंतपणा होता!
          ऊप्स ती केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स लॅब.. ते  विसरले तर कॉलेज आणि तो पूर्ण होईलच कसा  ? याची तर मज्जाच वेगळी असायची. त्याने मला वर नजर करुन पहावं म्हणून निमित्त करत आम्ही रोज उशीरा पोहोचायचो नि कितीतरी वेळ सरांची तीच ती बोलनीही खायचो. सर तिकडे बोलत बसायचे मी इकडे डोळ्यांचे चोचले पुरवायचे... कित्ती गोड चिडायचे ते सर .... आणि तेवढं करुनही सरांच मन भरायचं नाही ते आमच्या बॅच वेगवेगळ्या करायला जायचे. ये जुदाई मै भला होणे देती. मी बंड करून उठायचे नि म्हणायचे ' त्या लॅबमध्ये बर्नर, माचीसपेटी नाहीये सर, मॅडमने इकडेच पाठवलंय' आणि एवढ्या धाडसाने त्याच्याच बॅचमधे प्रॅक्टिकलला बसायचे. प्यार धाडस देता हैं कुछ भी करने का ... आणि हेच धाडस करत नजर मैत्रीणीशी भिडवत त्याच्याकडे हात करत बर्नरसाठी माचीस त्याच्याकडेच मागायची. नजरेला गुस्ताखी करण्याची संधीच द्यायची नाही. त्यामुळे सगळं बोलायचो पण बोलायचोच नाही.  अजब असायचं सगळं काही ....
             हाहाहा तो मराठीचा पेपर .... आज आठवतानासुद्धा कस ताजं वाटतय सगळं, जसं आत्ताच घडलं असावं नि मी चित्रपटात पाहत असावी.  त्याच्याकडे पेपर लिहायला परीक्षा पेपर नव्हता. मित्रांकडे मागितल्यानंतर मलाही मागितली. त्याने पहिल्यांदा काहितरी मागवलं आणि मी त्याला नकार द्यावा हे मला पटत नव्हतं म्हणून मी ' आहे  ना... पण बाथरुमला जाऊन येते मग देते.' म्हणून जी त्या कॉलेज स्टेशनरीत धूम ठोकली ती  माझ्याकडे नाही म्हणून परीक्षा सुरु व्हायचा शेवटच्या मिनिटापर्यंत बाहेर थांबून ती घेतलीच नि ती घेऊनच वरती आले. पण्ण माझं दुर्दैव हे की त्याआधीच त्याला परिक्षा पेपर मिळाल होता पण सुदैव हेच की परिक्षा निरिक्षकाने  पेपरला बसू दिलं. डर नापास व्हायचं नव्हतं रे कधी... दुसऱ्या वर्गात जाऊन बघायला कष्ट लागले असते ना जरा आणि स्वतःच्या वर्गातून त्याला बघण्याची मजाच काही और असायची. म्हणून ही उठाठेव !
          काय एक एक खूळ असायचं त्यावेळी मैत्रीणींच्या सांगण्यावरून नवीन ड्रेस घातला, नवीन हेअरस्टाईल केली की वाटायचं आधी त्याने बघावं एवढी साधी इच्छा आणि आणि आनंद असायचा तेव्हा. नाहीच कधी बघितलं तर थोडस हार्टफेल व्हायचंच यार्र प्यार नहीं था लेकीन एकतर्फा तो था त्यामुळे....'प्रेमात खचून नाय जायच बॉस ' हा मंत्रा कॉलेजभर पुरला ... पुढल्या दिवशी पुन्हा नवीन प्रयोग नवीन प्रयत्न, ना अहंकार ना ऍटिट्यूड ... सगळ कसं एकदम निर्मळ नि हार्मलेस होतं...
           सगळ झालं. आज तीन वर्षे झाली. सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्या असण्यापासून त्याची अटेंडेन्स लावण्यापर्यंत सगळंपण त्याला ना कधी कळलं, ना मला सांगावस वाटल ....
त्ते म्हणतात ना प्रश्न,भांडण,वाद आणि ब्रेकअप या गोष्टी प्रेम व्यक्त केल्यावर सुरू होतात म्हणून मी कधी बोललेच नाही.
 कारण त्याच्याबरोबर ब्रेकअपच दुख: नव्हत मला, फक्त माझ्या प्रेमाबरोबर मला ब्रेकअप नव्हतं करायच खरंच! जसं होतं तसं मस्त होतं, माझं होतं. यात मी खूश होते प्रचंड! ना अपेक्षा ना भीती. जो जवळच नाही, तो दूर जाण्याची भीती नसते आणि जो हृदयात आहे कित्येक वर्षापासून एकतर्फी प्रेमात, त्याने आपल्याला सोडावं हा लवलेश नसतो ....
"उसने कभी उस नजर से मुझे देखा नही बात अलग है,
लेकिन मे उसे उसी एकतर्फी-नजर से देखुंगी ये भी तेय है ||" या वाक्यातलं समाधान मला जपायचं होतं.
एकच समाधान असेल आयुष्यभर की, हे माझं हक्काच प्रेम ना लग्नानंतर मला आडवं येईल ना आत्ता ....
            फक्त ते दिवस असमंजस, खुळे निरागस आणि खऱ्या प्रेमाचे होते. ते परिकथेचे दिवस गेल्याचं थोडं दुख या समंजस आयुष्याचा ताण आला की मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आहे.  अन पहिला दिवस आठवल्यावर त्याचा चंपू तेल लावलेला चेहरा नि सेंड-ऑफच्या दिवशी स्पाईक्स केलेला चेहरा , दोन्ही बिफोर-आफ्टरसारखे आठवतील नि या बिफोर आफ्टरमधला एक अख्खा आठवणींचा जलाशय, त्याच्या हास्याने नि फक्त त्याच्या अस्तित्वाने तुडुंब भरलेला दिसेल ...

#shades of Love


ये उन दिनों की मोहब्बत हैं|

by on जुलै २४, २०१८
आज खूप दिवसांनी त्याची आठवण झाली ... प्रेम बीम नसावच ते, पण मला तो आवडायचा...  त्याच्या मित्रांमुळे मला तो आवडायला लागला. मी बघितलं आणि...

पाऊस यावा आणि तो माझ्यासाठी यावा.. स्वार्थी मी व्हावं... या पावसात माझी बरीचशी काळजी सहज ओसरते अनुभव आहे आतापर्यंतचा. त्यामुळे सगळ्या दुनियेला, त्याच्या मोहमायेला झुगारून मी त्याच्याशी समरूप होते, सगळं दु:ख सांगुन मोकळी होते...!
त्या घट्ट आकाशाच्या काळपट रंगात डोळ्यात डोळे घालून मी म्हटलं, "अब याद नहीं आती उनकी... सच ही तो कह रही हूँ| "
तितक्यात मला आठवलं सोबत मित्रही आहे आणि त्याच्या एका संभाषणाला कंटिन्यू करत तो एकसकट एक वाक्य म्हणाला,
"जितकं लवकर एखादी भावना स्वीकारशील ना, तितकं तुला सोप्प जाईल त्यातून बाहेर येणं किंवा किमान त्यातून सर्वाइव्ह करणं सोप्प होईल. नाहीतर ती मनात दाबून टाकली कि तिचा विस्फोट होतो... उधाण आलं तरी चालेल, बोलून टाकायला हवं... "
खरं होतं ते?
नेम्मक्क तेव्हा अचानक एखाद्या आठवणीला डोकवायचंच असतं, निमित्ताच्या ती शोधात असते....
आणि यावेळी मित्र म्हटल्याप्रमाणे मी त्या आठवणीला स्विकारून येऊही दिलंच... मलाही निमित्त हवं होतं...
"काय होतंय जास्तीत जास्त...?" म्हणत मी स्वतःलाच प्रश्न केला ...
"त्याची कडाडून आठवण येतेय." उत्तर मिळालं. पण मी चहा ठेवायचा बहाणा करून ते टाळल्यासारखं केलं ..
बाटलीतलं पाणी घटाघटा चहासाठी टाकला. साखर त्याची नि माझी मिळून दोन चमचे टाकली .... त्यात रागारागात गवतीचहा टाकलाच आवर्जून.
रागारागात ज्याची आठवण आली त्याच्याशी संवाद साधल्यासारख करत ध्यैर्याने मी बोलत होते; तुझ्या आठवणी मला आवडत नाहीत. पण गवतीचहाने त्यांना उधाण येणार असतं आणि मला ते उधाण निर्लाज्जसारखं हवं असतं... 'का हवं असतं?' हा दुधखुळा प्रश्न तु मला न विचारलेलंच बरं. हक्क तोही नाही तुझा.!
पण तितक्यात तो उकळणारा गवतीचहा विक्षिप्तपणे त्याच्या येणाऱ्या बुडबुड्यांतून मला खॊचकपणे विचारूनच टाकतो, "कुठे, आहे कुठे तो?"
मी त्यालाही टाळल्यासारख करते...
समोर मित्र बसलेला आहे...
गवतीचहाच्या दोन पाती न गाळताच तो कप स्वतःला घेत, दुसरा 'आज माझ्या हातचा चहा पाजते तुला.' असं म्हटलेला चहा त्याच्याकडे सरकवते. त्या सरकवण्याबरोबर रिटर्नमध्ये आधीची आठवण बॅकग्राऊंडला सुरु होते.
मित्राची  बडबड चालू असते आणि माझ्या बॅकग्राऊंडला तुझ्या भासांची असंख्य, अखंड बडबड सुरू असते...
"जिथे तु आणि मी असते फक्त."
जिथे तुझं अस्तित्व नसतं, मला ते नकोही असतं... कारण मला आत्ताचा तू नकोच आहेस... हवा आहे तो व्यक्ती, जो कधीकाळी माझा होता, ज्याच्यात मी होते... ज्याच्यात मी स्वतःला ठेवल्यावर मला कसलीच क्षणभरही काळजी नसायची.. कारण तूच म्हणायचास "मी तुझ्या सोबत नाही, तुझ्या आत आहे."
मी माझ्यातल्या तुला जोपर्यंत तू 'माझा' म्हणून होतास तोपर्यंतच्या आठवणीत जपलंय कारण त्या वेळचा तू दूषित नव्हतास. आणि मला या पावसात शुद्ध गोष्टी आवडतात... त्यामुळे आपल्यातले 'आपले' क्षण मी ठेवलेय कि... या सायंकाळच्या पावसातल्या चहासाठी नि बॅकग्राऊंडला असलेल्या तुझ्यासोबत कट्ट्यावर बसून तुझ्यात हरवून जाण्यासाठी. तू असाच तिथे राहा... कधीच जाऊही नको ना येऊही नकोस... 
मी आनंदाने स्वीकारतेय तुझं आठवणींमधलं असणं..
आणि माणसांमध्ये राहूनही स्वतःत जगणं ...

गवतीचहाचा बहाणा ...

by on जुलै २२, २०१८
पाऊस यावा आणि तो माझ्यासाठी यावा.. स्वार्थी मी व्हावं... या पावसात माझी बरीचशी काळजी सहज ओसरते अनुभव आहे आतापर्यंतचा. त्यामुळे सगळ्या दु...
"स्पर्शून माझ्या सर्वांगाला ... 

सुगंध तुझा अलवार आहे ... 

तू घे सावरून स्वतःला...  

मला सावरने आज शक्य नाही... "
मी पावसाबरोबरच बोलत होते. पर्याय नव्हता नं, सोबत्याने दुसरा पर्याय तरी ठेवला होता का?  सोबत्याला आज भेटणं शक्य नव्हतं म्हणे...
त्यामुळे मी पावसाशी बोलूनच थोड्याशा तनहाईचं सेलेब्रेशन करत होते ...;.
पावसा, चेहर्यावरून अलवार सरकून आतपर्यन्त माझ्या नसनसात गेलास तू ...
हात मोकळे करून सारे विश्व कवेत घेत होते मी ...
त्यात हा विजांचा कडकडाट, पावसा तू मला घाबरून देत होतास ... एकटी असल्याचा हा जुलमी फायदा तू घेत होतास, पण कोणाला काय पडलं नं! मी या रोमॅन्टिकपणात माझा 'हक्क' मिस्स करत होते...
त्या थंडाव्याने गारठून मी जात होते ...
तरी मन माझे मानत नव्हते पावसा तुला सोडायला ...
हट्ट सोबत्याचे कितीदा पुरवून तुझ्यात ना भिजले मी ...
माझे हे तुझ्यात भिजणे किती त्याला मोहित करायचे माहिते.? पण माझ्यात विरघळायचा हक्क फक्त त्याचा, म्हणून तुझ्या विजेपेक्षाही कडाडून चिडायचा हा तुझ्यावर...
पण मी अशी गुंतलेले केस मोकळे करत यायचे, ते तो पहातच राहायचा.... त्यामुळे का होईना थोडा आवडायचास त्याला तु... काय म्हणायचा माहिते, शब्दांनी खोटं नाही बोलवत म्हणणार होतो सुंदर दिसतेय पण यार्र मादक दिसतेयस तू. सांभाळ स्वतःला... पण्ण केसांतून झटकताना हळूहळू गारातून पडणारे थेंब त्यालाच इतके माझ्याजवळ ओढायचे की मला त्याला सांभाळावं लागायचं... आणि त्याला सांभाळण्याच्या त्या प्लानमधून जवळ घेण्याच्या त्याच्या आकर्षणात मी स्वतःला शातीरपणे सोडवून जी घ्यायचे ...
माझ्या अंगावर थेंब पडायचे, तो त्या पावसाला नावे ठेवायचास ..." हक्क तुझ्यावर फक्त माझा आहे" कित्ती आतून तो म्हणायचा....अशा क्षणी माझं तुझ्यावरचं प्रेम ऊफाळुन यायचं ते इतकं...
आज तू पडताना झेलत होते पावसा तुझे  टभुऱे थेंब  ... तरीही सोबत्या तुला शोधत होते मी  कुठेतरी मागे पुढे सगळीकडे ...
पावसात हे सगळं जे होतं जन्नत होतं .. या आजच्या पावसात तोच नव्हता ... अपूर्ण काय ते हेच होतं ...!
डोळे बंद करून पावसाला मी संपूर्ण चेहर्यावर, अंगावर, मनापर्यंतही पोहोचू दिलं ...वाटलं चिडचिड होऊन तो भेटायला तरी येईल...  पण ... तो आलाच नाही.
शेवटी वैतागून, थंडीने कडकडून आमच्या नेहमीच्या टपरीवर त्याच्या विचारात त्याचा संताप करत एक फक्कड अद्रक चाय सांगितली... "क्या म्याडम, साब नहीं आयें...?" नेमक्का चायवाला बोलला...
"याला आजच साब आठवतोय नेमका..."
मी चहावाल्याला सर्रळ इग्नोर केलं....
केस मोकळे करून दातात क्लिप अडकवून बांधता बांधता विचारच करत होते, त्या विचारांना बाजूला सारून बघते तर्र काय ...? समोर.... तो .... :O
व्हॉट्ट.... I was like what the ***  तोंड उघडं ते उघडंच, तोंडातला क्लिप जसाच्या तसा खाली पडला पण्ण मग वाटलं भास होऊच शकतो हा गेला खड्ड्यात मला काय फरक पडत नाही... मी इग्नोर केलं... पुन्हा खरचं तो होता का या अनपेक्षेने पहायला गेले ... तो खर्रच... खर्रच खर्रच तो होता....
पण्ण त्यातही मला आठवलं मी चिडलेली आहे, त्यामुळे सगळी एक्साईटमेन्ट सगळे किसेस हग्ज दूर डोंगरावर नेऊन ठेवत मी त्याला म्हटलं,
"उशीर झाला तुला ... एक पाऊस उधार ठेवला तुझ्यावर आज मी ...निघते बाय भेटू पुन्हा तुझ्या सवडीने!'  ... नि निघणार तोच मागून हात धरून तो म्हणाला,
"ए- जान-ए-मन... पाऊस आहे तो आणि मी 'मी' आहे कळलं.... त्या पावसाला माझ्याशी जिंकण सोप्प नाहीए हे पक्क डोक्यात फिट करून घे.?"
त्याच आनंदाला लपवून चिडक्या सुरात मीही म्हटलं "ए चल्ल हट्ट जेअलस मुलगा.. दुर होके भी एहसास उसका आबाद हैं... तु आत्ता आलयंस पावसातही आणि आयुष्यातही." 
"ए - नाजनीन! कसं आहे ना... असे कित्येक क्षण माझ्या वाट्याला आले आहेत, ज्यात फक्त तू आणि मीच होतो ... तो कितीही जूना असला तरी त्याला 'मी' होणं शक्य नाही आणि तुला त्याच्यावर ' माझ्यावर करते ते प्रेम' करणं शक्य नाही....आणि उलट खरं सांगायचं तर आज थोडावेळासाठी काय त्याला 'तुझ असणं उधार दिलं' इतकंच काय घडलं.. त्यामुळे उधारी त्याची माझ्याकडे झालीय ... त्यामुळे तू जाऊ नकोस लग्गेच तो आत्ता पडेल आणि पडेलच देखना तुम .. ठरलंय तसं."
मी स्तब्ध म्हणजे त्याच्या त्या बोलण्याने काय बोलावं समजेना...  चिडचिड कद्धिच संपली होती. मला खूप नवं वाटत होतं... मी त्याच्या नजरेशी नजरच मिळवू शकत नव्हते, कारण मुळात हे सगळं फार परीकथेसारखं असलं तरी खोटं वाटत होतं मला..
अशातच इकडे तिकडे पाहत होते, त्याच्यावर चिडून आणिया निसर्गावरही... तितक्यात  वाऱ्याने काय ते सुखद खुणावलं, वार्याच्या थंडाव्यात विश्वास नाही बसला पण हळूहळू पावसाचे थेंब मला स्पर्शून जाऊ लागले ... वाढून विरळविरळ म्हणत त्या थेंबानी मला तो समोर दिसेनासा झाला... पण पावसाच्या या जोरदार मीठीत मला स्पर्श भावना आणि श्वासांत सुवास होता त्याने घट्ट पकडलेल्या माझ्या हातांचा... त्याचं  पडणं माझ्या नजरेगणिक जास्त जास्त वाढायला लागलं होतं. मी चिडलेली हळूहळू ओसरायला लागले होते पण मनातून ठरलं होतं त्याच्यासमोर ओसरायचं नाहीचे...
हळूहळू हळूहळू येणारा तो आता पूर्ण धाडधाड कोसळायला लागला... आणि थोड्यावेळाने भानावर येऊन शेजारी याच्याकडे पाहिलं, गर्वाने निरागसपणे काय पाहत होता तो माझ्याकडे मला समजलं नाही पण्ण त्या भर टपरीवर, मोकळ्या आसमंतात, माणसांच्या गर्दीत, माझ्या केसांतून तरळणार्या केसांच्या बटेला मागे सारत," माफ कर ना जीवा ¡ .... पुन्हा चुकूनही ही चूक नाही होणार .... एक्स्ट्रीअमली सॉरी नं ..."
"ही चूक नाही म्हणजे नवी चूक करणार तु ..." मी जोरात खोटंखोटं रागावले...
डोळे बारीक केविलवाणे करून पाहतच राहिला की तो .... आणि एकसाथ जे हसलो दोघे ....
पावसा खास है तू !
दोघांनी सोबत वरती पाहीलं त्याने माझ्यासोबत पावसाला अनुभवलं नि
' तू आज पुन्हा एकत्र आणलंस आम्हाला.' म्हणून मी पावसाचा शुक्रिया अदा केला
"उधारी आमच्याकडे तुझी राहीली नेहमीसारखीच." म्हणून अलविदा करत बिनदिक्कत स्वार्थी बनून मी याच्या मीठीत विसरून गेले  पावसालाही....


उधार पाऊस ...!

by on जून २१, २०१८
"स्पर्शून माझ्या सर्वांगाला ...  सुगंध तुझा अलवार आहे ...  तू घे सावरून स्वतःला...   मला सावरने आज शक्य नाही... " मी...
आम्ही दोघेही पडल्या पडल्या गुणगुणत होतो,

'रूह से चाहने वाले आशिक़,
बातें जिस्मों की करतें नहीं...|'


रेडिओवर चाललेलं हे गाणं ऐकता ऐकता त्याच्या केसांत बोटं फिरवत मी सहजच त्याला म्हटलं,
"जर का मीही आयुष्यात ही अशी चूक केली तर.?"
"तुला कळतंय ना तू काय म्हणतेय ?" तो अच्चानक अग्रेसिव्ह होऊन उठलाच...
"अब्सुल्युटली... सांग ना नेमकं काय होईल तु मला सोडून जाशील.?, मी सहजच म्हणत होते.
"तसा कुणी आहे का.?" त्याला पटापट साताठदहा प्रश्न विचारायचे होते लक्षात आलं माझ्या.
"असेलही. तुझ्या उत्तरावर पुढे सांगायचे की नाही ठरेल." मी त्याची फिरकी घेण्याच्या मूडमध्ये म्हटलं.
"तु असा जीव टांगणीला का लावतेयस.? आधी सांग काय झालंय नेमकं...? हॅव यू किस्ड इच अदर ?"
"डोन्ट गेट पजेसिव्ह. शांततेत बोलूया या विषयावर?" त्याने डायरेक्ट किस्सबद्दल विचारलं तेव्हा ठरवलं आता सिरियस्लीच बोलण्याची गरज आहे.
"हो... डिपेंड करतं की तू नेमकं काय केलयं.?" त्याचा दृष्टीकोण त्याच्या उत्तरांतून अजून जास्त कळत चालला होता. मीही कंटिन्यू केलं.
"आर यू सिरियस ? म्हणजे तु म्हणतोयस की, तु मी काहीतरी केलंय यावरून आपलं इतक्या वर्षांच नातं तोडून टाकशील.?
म्हणजे मीठी मारली असेल तर कशी मिठी?, कितीवेळ आणि का ? ? किंवा मग किस्स असेल तर कसा किस.? लिपलॉक की गालावर...? किंवा त्यापुढे इफ वी एन्ड अप इन बेड मग तर तिथे तु कुठलीच शक्यता न ठेवता ते नातं तोडून टाकणार असंच नं ...?"
"इट्स ऑब्वियस माय लव्ह!" हे त्याने ज्या टोनमध्ये म्हटलं, त्याने माझा राग वाढत चालला होता. कारण त्याला माझी याबद्दलची मतं, दृष्टीकोण चांगलाच माहिती होता. त्यामुळे त्याच्याकडून येणाऱ्या प्रत्येक उत्तरावर मी शॉक होत होते. तरीही धुसर सगळं स्पष्ट व्हावं म्हणून मी प्रश्न विचारला...
"ओह्के...! आणि जर का आम्ही हे सगळं केलं असेल म्हणजे मीठीत घेण्यापासून किसपर्यंत आणि त्याहीपुढे जाऊन तु जो विचार करतोय तेही घडलं असेल तर.?"
"_______" तो काहीच बोलला नाही.
मी कंटिन्यू केलं,"आणि जर का तसं काही आमच्यामध्ये घडलं असेल आणि यापुढे आम्ही एकमेकांना भेटणारही नसू असं ठरवलं असेल तर? त्यामुळे यापुढे आमचा एकमेकांशी कसलाच संबंध येणार नसेल. तरीही तुला प्रोब्लेम असेल.?"
"तु आता खरंच माझ्या डोक्यात जातेयस. मला सुचत नाहीये काय बोलू... मला क्लियर सांग काय झालं आहे नेमकं.?"
"उम्म्म्मम्मम्मम,
मी फक्त विचार करत होते की जर लोकं म्हणतात, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या त्या दोन्ही व्यक्तींनी एकमेकांशी प्रामाणिक असलं पाहिजे. त्यातील एकाही व्यक्तीने त्या व्यक्तीव्यतिरिक्त तिऱ्हाइत व्यक्तीशी नातेसंबध (स्पष्टच म्हणायचे तर लैंगिकसंबंध) ठेवले तर ती व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीला फसवत असते."
त्याच्या चेहऱ्यावरचे भाव माझ्या प्रत्येक वाक्याला बदलत होते ... मी बोलत राहिले...
"पण मी खूप दिवसांपासून गोंधळात पडलेय. म्हणजे बघ हां नात्यात असलेली ती व्यक्ती आणि तिऱ्हाइत व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यांच आकर्षण कुठल्याच मार्गाने भावनिक नसतं. त्यामुळे त्यांच्या आकर्षणात निव्वळ निव्वळ ओढाताण असते एकमेकांच्या शरिराची. आणि ते आकर्षण थांबणही शक्य नसतं मग एका अशा अघोऱ्या क्षणी ती दोघे तो क्षण बिनधास्त अनुभवून घेतात. काही बेफिकिरीने, काही गिल्टने ..."
"तुझा मुद्दा कळेल मला स्पष्ट.? तु या विषयाबद्दल सकारात्मक दृष्टीकोण मांडून स्वतः जे काही केलंय त्याचं समर्थन करत नाहीयेस बरोबर?"
"आधी मला बोलू दे पूर्ण !
म्हणजे बघ नं मी एकदा तुला विचारलं होतं की, एखादी व्यक्ती आपल्याला का आवडू लागते.? किंवा त्याच व्यक्तीच्या प्रेमात आपण का पडतो.? तेव्हा तुच म्हणाला होतास नां, 'प्रेम हे भावनिक टेलिपथी जुळल्यावर, विचार जुळल्यावर होतं. असं खूप कमी व्यक्तींबद्दल वाटतं आयुष्यात. आणि माझ्यासाठी ती व्यक्ती 'तु' आहेस...'
तर मग तुझ्या म्हणण्याप्रमाणे विचार केला तर मला एक प्रश्न सारखा पडतोय की, तिऱ्हाइत व्यक्तीने तुझ्या प्रिय व्यक्तीच्या निव्वळ त्वचा म्हणवणाऱ्या त्या शरीराला स्पर्श केला तर तु नातं तोडण्याचा इतका टोकाचा निर्णय का घेतोस.?"
"मला ना...______"
"तु थांब ... तुला आत्ता काही बोलता येणार नाही, किंबहुना सुचणारच नाही.
मला माहितीये तुला काय म्हणायचे आहे. हेच ना की, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीच्या हक्काचा तो स्पर्श असतो. तो त्या व्यक्तीच्या नावे केलेला एक 'स्वर्गीय क्षण' असतो."माझ्या या वाक्याने त्याच्या कपाळावरच्या रागीट आठ्यांचा शीण किंचित ओसरल्याचं जाणवलं. ही फक्त एका बाजूने विचार करतेय हा त्याचा भ्रम मी त्या एका वाक्याने दूर करत पुढे बोलू लागले...
"पण मग जर मी तो क्षण दुसऱ्या कुणा व्यक्तीबरोबर अनुभवला म्हणजे त्यानंतर मी तो क्षण तुझ्याबरोबर तितक्याच गहिरेपणाने अनुभवू शकणार नाही असं काही असतं का.?...
मग तर तुझा मागच्या चार प्रेयसींबरोबर तो क्षण आधीच अनुभवून झाला आहे. मग.?"
"तुमच्यात खरंच तसं काही घडलंय का.? मी शांततेत विचारण्याचा प्रयत्न करतोय हां... तू बाकीचे संदर्भ काय सांगत बसलीयस .. कित्ती ताणवणार आहेस अजून. घडाघडा काय ते बोलून टाक ना यार्र आता..." तो अंगाशी आलेलं सगळं सावरून बोलत होता.
"बघ हं... म्हणजे सध्याच्या परिस्थितीला तुला मी खुप बालिश वाटेल. पण एवढंच सांगावंस वाटत होतं, प्रेम आहे ते. त्यात शारीरिक क्षण महत्वाचा असतोच. कदाचित तोच असा क्षण असतो जिथे ती प्रेम करणारी दोघे या दुनियेपासून, सगळ्या स्वार्थापासून दूर होतात नि एकमेकांशी शरिराने तर जोडले जातातच पण ते भावनेनेही एकत्र येतात.
आकर्षण असतं तिथे फक्त शरीर ती क्रिडा उपभोगत असतं परंतु जिथे प्रेम असतं तिथे त्या व्यक्तीचा रोमरोम ते उपभोगून सुखी होत असतो. याशिवाय हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न की त्याने कुणाबरोबर शारीरिक संबंध ठेवावे.
पण आपल्या नात्यात, आतापर्यंतच्या या नाजूक संवादात मला अपेक्षा होती की, तू एकदा तरी काळजीपोटी विचारशील की,' तु तुझ्या मर्जीने तो क्षण अनुभवलास का.? किंवा कोण आहे तो मुलगा..? असं का घडलं अचानक.? किंवा मग माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तु असं काही करणारच नाहीस... किंवा तसं काही घडलंय तर मला नीट सांग काय झालं आहे, आपण त्यावर सोल्युशन काढू...
आणि सोल्युशन काही उरलंच नसतं तेव्हा तु खुशाल त्या नात्यापासून मोकळा झाला असता तर काहीच वाटलं नसतं.
पण्ण नाही तुला फक्त तो क्षण ऐकायचा होता नि त्यापुढे मी बोलायला सुरुवात केल्यापासून तुझ्या मनात ब्रेकअप ठरलंच होतं.
आपला संवाद सुरु झाल्या झाल्या तुझं ते ओव्हरपजेसिव्ह होणं मी मान्यही केलं कारण मला माहितीये प्रेम हे आकर्षणाशिवाय पुर्ण होणारे का ...? पण त्यानंतर तु ज्या अतिअविश्वासाने सगळं काही बोललास त्यामुळे मी मुद्दाम हे विरुद्ध फासे टाकले आणि तुझा 'नात्याचा आदर करतो. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे वगैरे वगैरे वगैरे' मुखवटे अस्से गळून पडले त्यावरून तरी वाटतंय मीच कुठेतरी या नात्याचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे.
बाय द वे, मी फक्त त्या गाण्याचे शब्द ऐकले,
"रुह से चाहने वाले आशिक़,
बातें जिस्मों की करतें नहीं...|"
नि कल्पनेने तुला हा प्रश्न विचारला.
पण या तुझ्या एकंदरीत अज्ञानी रिॲक्शनवरून एक सांगावसं वाटतंय,
"रुह और जिस्म पत्तीया दोनों एकही पेड कीं है।
दोनों के बीच एक बारीकसा धागा हैं उसें समझने में जल्दबाजी कर दीं हैं तुमनें|"

त्यामुळे शरीर आणि आत्म्यातील तो धागा शोध,
समज,
आत्मसात कर,
त्यातील वास्तव 'प्रत्यक्षात' पचव,
मग भेटू आपण...
बाय!

 मेरे बस दस प्रतिशत हिस्से से वाकिफ़ हो तुम, फिर कभी मिलेंगे॥



                                                           



रिटच रूह

by on मे २६, २०१८
आम्ही दोघेही पडल्या पडल्या गुणगुणत होतो, 'रूह से चाहने वाले आशिक़, बातें जिस्मों की करतें नहीं...|' रेडिओवर चाललेलं हे गाणं ऐकत...
आणि जर का आपला सगळा शृंगार झाल्यानंतर पाऊस आला तर ?? 
तो गाडी घेऊन घराबाहेर उभा होता... गर्द लाल रंगाची साडी, त्याला बांधणीचे घुंगरू, साडीला काळे काठ, ब्लाउज स्लीव्हलेस काळ्या रंगाचा, ओठांना लाल लिप्स्टीक गालावर लाली, बारीक नाजुकशी टिकली खास त्याला आवडते म्हणून... आणि या सगळ्या साजश्रुंगारानंतरच पाऊस बरसायला लागला तर ? 
तर काही नाही ... त्या पावसाला अज्जिबात न जुमानता मी छत्री घेऊन त्याला तशीच भेटायला गेले .. त्याच्या हातात कॅमेरा होता, तो आधीच काहीतरी करत होता त्यात, तितक्यात त्याने नकळत लेन्सचा फोकस माझ्याकडे केला आणि माझा तो चिडचिडेपणा, अदा टिपल्या ... आणि माझा राग... उफ्फ... त्या रागालाही विडीओत कैद केलं .. 
"आपल्या चिडण्याचाही उत्सव व्हावा यापेक्षा वेगळं काय हवं होतं ..." 
माझं सगळं बोलणं, खरतर चिडणं झाल्यानंतर मी गाडीवर बसायला लागले.
त्याने तसाच हात घट्ट पकडला, गाडी स्टॅन्डवर लावली. माझ्याकडे एकही कटाक्ष न टाकता एका फिल्मप्रमाणे तो एका हिरोसारखं त्याच्या हिरोइनला घेऊन जायला लागला...
मी त्याच्याकडेच बघत होते ... पावसात ओला झाल्यामुळे तो भलताच क्युट आणि आकर्षित दिसत होता ... खास करुन त्याची ती खळी ...उफ्फ !!! जान बसती है उसमें मेरी.... घरी पोहोचल्यामुळे तिथे त्याला बघण्याचा कार्यक्रम संपला... 
         मला खाली उतरवलं, कुलूप उघडलं. पुन्हां दोन्ही हातांनी मला उचललं आणि तेही माझ्या मेकअपला अजिबात धक्का न लावता ... आणि सोफ्यावर बसवलं...आणि तो असा समोर बसला...खरंतर मी दुसरीकडे बघणं अपेक्षित होतं त्याला, पण मला त्याच्या डोळ्यातच बघायचं होतं, माझं सुंदर सजलेलं आयुष्य त्यात मला दिसत होतं. आणि अचानक मी माझ्या विचारांतून बाहेर पडून त्याला पाहू लागले. त्याच्या त्या सगळ्या हालचालींना पारखत होते, तो केवढा ब्लश करत होता, पहिल्यांदा कोण्या मुलाला ब्लश करताना पाहत होते...
एका पॉईंटला तर माझं बघणं अति झालं म्हणून तो म्हटला,'चल कॉफी बनवतो तुझ्यासाठी, खास माझ्या हातची ..'
            तो जायला लागला, मी घट्ट त्याचा हात पकडला. त्या ओल्या सफेद शर्टामध्ये तो काय दिसत होता... पारदर्शक, मादक म्हटले तर माझ्या स्वभावात बसणार नाही पण त्याच्या तशा असण्याला नाकारु शकत नव्हते ... त्याचा मागून पकडलेल्या हाताला तसंच पुढे करत त्याच्या कमरेला विळखा घालत त्याला मीठीत न घेता त्याच्या पायांवर पाय ठेवत त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या श्वासांच्या इतक जवळ गेले की आमचे श्वास वेगवेगळे उरलेच नाही. मी स्वतःला  त्याच्या स्वाधीन केले...
             त्याने स्वतःला माझ्या हातून सोडवत, विषय बदलावा तसं आधीचे ते सगळे फोटो विडीओ दाखवायला सुरुवात केली आणि त्याच्या नकळत मी आमचं 'लग जा गले' लावलं...ते माझ्यापेक्षा त्याच जास्त फेवरेट होतं, आणि मी मुद्दाम लावलं होत. कारण अशावेळी त्याने फोटो काढल्यामुळे मला थोडा रागच आला होता, राग आल्याचं भासवून मी त्याला खोडकरपणे मारायलाच लागले की पुन्हा त्याची ती खळी दिसली.....त्या खळीत अडकलेल्या त्या थेंबाने मी त्याच्याकडे पुन्हा खेचली जावून त्याच्या गालाच मनसोक्त चुंबन घेतलं ....
            त्याने हात पकडून मला स्तब्द केलं, ""क्या हुआ है तुझे ?  तू वेडी आहेस का ? चुकून माझ्याकडून काहीतरी होऊन जाईल त्यापेक्षा तु दुर रहा ना, कारण तू आज भयंकर सुंदर, अप्सरा नाही ते चीजी वाटेल पण गझल दिसतेयस ... चांद म्हणून तुझ्या सौंदर्याला कैद करणार नाही कारण आज कुठलीच उपमा तुझ्या सौंदर्याला कैद करु शकणार नाही आणि ते केस जरा बांध ना ... आणि तुझा हा राग ना घनदाट मोहक आहे ..त्याला काबूत ठेव. माहिते तुला ? तुझ्या सौंदर्याच्या आधी तुझा हा राग माझं प्रेम आहे .. आणि म्हणून हा आजचा पाऊस पडतोय, मला पुन्हापुन्हा तुझ्या प्रेमात पाडण्यासाठी... " 
"मला तुझ्या शब्दांच्या मालिका नको आहेत... फक्त तुझी ती टभूरी खळी हवी आहे आणि तुझी मीठी उउम्म आणि संपूर्ण तू कुठल्याही बंधनाविना...  नाहीतर तू निघ लगेच." 
कैक घटकेपासून ताटकळत राहिलेल्या माझ्या ओठांना फक्त तो हवा होता. त्यामुळे मी सभ्यपणाचा आव आणणं टाळलंच ....पावसावर संताप, त्यांनतर त्याच्या अशा वागण्यावर संताप म्हणून मी गळ्यातला हार आणि ती लिपस्टिक पुसत पुसत आतमधल्या खोलीत निघाले. 
आणि तो म्हणाला,
"अल्फाज नहीं ग़ज़ल हो तुम,
मेरे वजूद से पूरी हो तुम,
आधे में मुझे छोड़ जाए ऐसी कहां हो तुम,
क्योंकि खुद से ज़्यादा मेरी हो तुम| "

हिरोइन नाराज होऊन जावी आणि हिरोने तिला मनवावं अशा अधीर सुरात म्हणत म्हणत तो पुढचा एकही क्षण न दवडता माझ्या जवळ आला. माझे हार्टबीट हजाराच्या गतीत वाढत चालले होते, स्वतःला कुठल्याच मर्यादा न लावता त्याने मला जवळ ओढलं, मीठीत घेतलं, इतकं घट्ट की माझ्या स्तनांचा त्याच्या छातीला स्पर्श झाला... सिक्सपॅकचा तो पुरुष त्याच्या स्पर्शाने  भलताच वेगळा आणि फक्त माझा उरला होता. त्याने मिठीतच अलगद माझ्या ओठांवर त्याचे ओठ जमवले.

          तो स्पर्श स्वर्गानुभुती मिळावी इतका शुद्ध होता. मी डोळे मिटले, माझ्या स्पंदनांनी त्याला इजाजत दिली. श्वास थांबत नव्हते, शब्द गोंधळले होते. माझे श्वास घटकांघटका वाढत होते, त्यांचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत होता. कित्येक दिवसांच्या विरहानंतर प्रियकराने विळखा घालावा तिला, तसं त्याने मला जवळ खेचून सर्वांगाच चुंबन घेतलं, तो उपभोग भलतच सुख देणारा तृप्त करणारा होता... आम्ही इतके दिर्घ होत गेलो हळूहळू शांत झालो ...  आणि शेवटी हळूच त्याने कपाळावर एक मऊ चुंबन देउन तो क्षण माझ्यानावे केला...  आमचं ते भांडण आमच्या नात्यातला पहिला शरीराक्षण देऊन गेला, ते भांडण कुठल्या कुठे गेलं पण भांडणातलं किस्स हा इतका अनोखा असतो ते त्या दिवशी कळलं.

बारिश में वो पहली मोहब्बत...

by on फेब्रुवारी १३, २०१८
आणि जर का आपला सगळा शृंगार झाल्यानंतर पाऊस आला तर ??   तो गाडी घेऊन घराबाहेर उभा होता... गर्द लाल रंगाची साडी, त्याला बांधणीचे घुंगरू...